Friday, July 28, 2023

२० साह्यक पोलीस निरीक्षकांच्या सातारा जिल्हाअंतर्गत बदल्या...

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


२० साह्यक पोलीस निरीक्षकांच्या
सातारा जिल्हाअंतर्गत बदल्या 

सातारा ता,२९(प्रतिनिधी) सातारा जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले असून बदली ठिकाणी तात्काळ हजर राहून पूर्व अहवाल देण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम २२ न पोटकलम ( २ ) अन्वये , जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार एकूण 20 साह्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या जिल्हया अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून करण्यात आल्या आहेत .  सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून नव्याने नियुक्ती बदली करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचा तपशील पुढील प्रमाणे

१ सपोनि प्रशांत दतात्रय बधे (प्रभारी उंब्रज)

 २ सपोनि सुशिल भास्कर भोसले (प्रभारी लोणंद )  

३ सपोनि शिवाजी बबन भोसले (प्रभारी वाठार ) 

४ सपोनि अशिष दिलीप कांबळे (प्रभारी पुसेगाव)

५  सपोनि विजय भागवत गोडसे  (प्रभारी कोयनानगर)

६ सपोनि चेतन मनोज मछले (प्रभारी कराड वाहतुकशाखा)

७ सपोनि अजय लक्ष्मण गोरड (कराड शहर )

८ सपोनि विशाल किसनराव वायकर (खंडाळा)

९ सपोनि  संजय सजन बोंबले (वाचक पोलीस अधीक्षक)

१० मसपोनि सरोजिनी विलास पाटील(कराड शहर)

११सपोनि संदीप निवृत्ती सूर्यवंशी (कराड शहर)

१२ सपोनि सुधीर सुर्यकांत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा)

१३ सपोनि रोहित रमेश फार्णे (सातारा शहर)

१४ सपोनि किरण रविद्र भोसले (सातारा शहर)

१५ सपोनि अविनाश ज्ञानेश्वर माने (सातारा शहर)

१६ सपोनि अशोक हनुमंत हुलगे (फलटण ग्रामीण)

१७ सपोनि नवनाथ विभीषण रानगट (फलटण ग्रामीण)

१८ सपोनि चिमाणी वैजिनाथ केंद्रे  (शिरवळ) 

१ ९ सपोनि संदीप आनंद कामत (पाटण)

२० मसपोनि  शैलेजा सर्जराव पाटील (कराड तालुका)

 वरील सर्व नमूद पोलीस अधिकारी  यांनी तात्काळ नविन नेमणूकीचे ठिकाणी हजर होवून त्याबाबतचा पूर्तता अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Friday, July 14, 2023

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर...

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Thursday, June 29, 2023

क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभागातून एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा : भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी...

               रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभागातून एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा : भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी

 महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना सोयीसुविधा मिळून ते सक्षम होण्यासाठी, क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे आणि पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाप्रमाणे  प्रत्येक विभागात क्रीडा मतदार संघ तयार करून त्यातून प्रत्येकी एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा अशी मागणी भा ज पा सातारा शहराध्यक्ष आणि  गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार  (सातारा जिल्हा ) विजेते , विकास गोसावी यांनी जिल्हाध्यक्ष आमदार श्री जयकुमार गोरे आणि आमदार श्री छ  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली 

 महाराष्ट्र राज्यातील क्रीडाक्षेत्र आणि खेळाडू यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू यांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि खेळाडू सक्षम करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य  क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाप्रमाणे क्रीडा मतदारसंघ तयार करून  प्रत्येक विभागातून एक क्रीडा  आमदार निवडावा अशी मागणी करत या साठीचे निवेदन आणि लेखी प्रस्ताव विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना सादर केला 
 
क्रीडा क्षेत्रात अनेक समस्या आहेत, स्टेडियम, क्रीडांगणे, खेळाडू, शाळा कॉलेज यांचा क्रीडा विभाग यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो,
अनेक ग्रामीण खेळ हे परदेशात जातात आणि त्या ठिकाणाहून नवीन नावाने त्या देशाचे नाव घेऊन हे खेळ भारतात येतात आणि नंतर त्यांना मान्यता मिळते.
 
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना जी नवीन खेळांना मान्यता देते ती एक  सोसायटी अंतर्गत रजिस्ट्रेशन झालेली संघटना आहे , त्यांच्यावर शासनाचे नियंत्रण काहीच नाही , त्या मुळे नवीन खेळांना लवकर मान्यता दिली जात नाही,क्रीडा परिषद आणि क्रीडा, युवक संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विषय असून ज्या संघटनांना महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना मान्यता देते त्यांच्या स्पर्धा भरवण्याचे काम हे विभाग करतात , या मध्ये सर्व शासकीय अधिकारी असल्याने ते त्यांच्या नियमाप्रमाणे काम करतात 
 
 या सर्व बाबींमुळे ग्रामीण खेळांकडे, ज्यांचा उगम महाराष्ट्रात, भारतात झाला आहे अशा खेळांकडे  दुर्लक्ष होत आहे,अनेक क्रीडांगणे, स्टेडियम चे स्थानिक धनदांडग्यांच्या फायद्यासाठी व्यापारीकरण करण्यात आले आहे 

क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन  करून त्या मार्फत क्रीडा विश्वाच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांचा अभ्यास करून त्यांचे कायमस्वरूपी निराकरण करावे
त्याच प्रमाणे ज्या नोंदणीकृत संघटना आहेत त्यांच्या सदस्यांची, नोंदणी केलेल्या अठरा वर्षे  पूर्ण झालेल्या खेळाडूंची मतदार यादी बनवून  प्रत्येक विभागातून क्रीडा क्षेत्रातील एक आमदार निवडून क्रीडा क्षेत्राचा विकास करावा

क्रीडा क्षेत्र हे खूप मोठे आहे , प्रत्येक घरातील एक तरी मुलगा, मुलगी, किंवा मोठी व्यक्ती या क्षेत्राशी निगडित आहे , या महाराष्ट्र राज्य क्रीडाक्षेत्र विकास महामंडळाची स्थापना करून, प्रत्येक विभागातून एक आमदार निवडून , आपण या क्षेत्रातील समस्या हाताळण्यास सुरुवात केली तर त्या मुळे क्रीडा संघटना, ग्रामीण खेळ आणि खेळाडू यांना न्याय मिळेल आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले ध्येय
 " खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया"  अभियान यशस्वी होण्यासाठी मदत होईल, असे निवेदनात नमूद केले आहे 
                 
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून क्रीडा क्षेत्रातील सर्व संघटनाचे प्रतिनिधी त्यात घेतले तर, ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन मिळेल 
 
 क्रीडा क्षेत्राचा विकास म्हणजे तरुणांना त्यांच्या क्रीडा क्षमता/सहभागासह प्रगती करण्यासाठी दुवे आणि संधी प्रदान करणे . आपल्याकडे अत्यंत कमी सुविधा, मैदानांची वानवा, खेळाडुंना पुरवल्या जाणाऱ्या सोयी उपलब्ध आहेत , खेळाडूंना दजेदार साधने मिळाली पाहिजेत ,या क्रीडा क्षेत्र विकास महामंडळाचा फायदा यासाठी होईल. ज्या खेळांच्या संघटना आहेत त्यांनाही स्वतःचे मैदानच नाही अशी अवस्था आहे त्यातुन त्या खेळाला किती लाभ होणार आणि त्यातून महाराष्ट्राला किती खेळाडू  मिळणार, यासाठी   क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून   त्या मार्फत येत्या काळात भरीव योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला , तर आणि तरच क्रीडा क्षेत्रातही ‘अच्छे दिन’ येतील. 
नवी धोरणे, नवे उपक्रम, गणवत्तावाढ करण्याची तीव्र इच्छा, परिवर्तनच्या दिशेने उचललेली पावले, गतिमानता व लोकसहभाग हे साध्य करण्यासाठी प्रभावी योजनांच्या कार्यवाहीचे प्रयत्नही या महामंडळा मार्फत करण्यात यावेत ,या महामंडळात कर्मचारी नेमताना ते राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंमधूनच नेमले जावेत 
 
प्रत्येक तालुक्यातील सर्व खेळाडु  मग ते कोणत्याही खेळाशी संबंधित असुदे  त्या खेळला महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची मान्यता नसली तरीही त्या खेळाडूंची, प्रशिक्षकांची आणि पंचपरीक्षकांची नोंदणी ही महामंडळाकडे करण्यात यावी, या साठी एक अँप विकसित करावे  ज्या मध्ये खेळाडू, खेळ, प्रशिक्षक, संघटना याची पूर्ण माहिती घेऊन हि माहिती सदर संघटनेकडून तपासून घ्यावी , प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच परीक्षकांना एक कायम स्वरूपी आयकार्ड आणि नोंदणी क्रमांक द्यावा,एखाद्या शासकीय किंवा संघटनेच्या स्पर्धेत खेळताना, खेळाडूंना, प्रशिक्षकांना किंवा पंच परीक्षकांना इजा झाल्यास त्यांच्या औषधोपचाराचा खर्च महामंडळाने करावा, त्या ठीकाणी एखादा अवयव बसवावा लागला, ऑपरेशन करावे लागले तरी त्या बाबत महामंडळाने मदत करावी,महामंडळाकडे नोंदणी झालेल्या सर्व खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा आणि पंच परीक्षकांचा अपघाती विमा महामंडळाने काढावा . प्रत्येक जिल्ह्यात  ज्या शाळा कॉलेज चे खेळाडू जास्त प्रमाणात आणि जास्त खेळात सहभागी होतील त्या मधील पहिल्या पाच शाळांचा सन्मान सुद्धा महामंडळा मार्फत प्रत्येक वर्षी केला जावा 
 
विविध खेळांच्या असोसिएशन मार्फत प्रत्येक वर्षी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात, याचसाठी काही असोसिएशन कडून स्पर्धेसाठी खेळाडूंच्याकडून  शुल्क आकारले जाते, पण काही खेळाडूंकडे यासाठी पैसे नसल्याने त्यांच्याकडे क्षमता असताना सद्धा ते खेळु  शकत नाहीत म्हणून  या घेतल्या जाणाऱ्या तालूकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धाचे नियोजन या महामंडळाच्या जिल्हास्तरीय समितीमार्फत व्हावे खेळाडूंच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये.
महामंडळाने या साठी संघटनांना मदत करावी आणि ती रोख स्वरूपात न देता त्या स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, खेळाडूंना जेवण, नाश्ता, पंचपरीक्षक मानधन, या स्वरूपात द्यावे. खेळाडू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन च्या गाडीने किंवा रेल्वेने आले तर त्यांचा प्रवास खर्चही यातूनच केला जावा ,जेणेकरून प्रवास खर्चासाठी पैसे नसल्याने गुणी खेळाडू मागे राहणार नाही   जे खेळाडू खाजगी वाहनाने स्पर्धेसाठी जात असतील किंवा परत येत असतील तर त्यांच्या गाडयांना  सर्व ठिकाणी  टोल माफ करावा. 

 ग्रामीण आणि पूर्वापार खेळल्या जाणाऱ्या खेळांना महामंडळाने सहकार्य करून शासकीय मान्यता मिळवून द्यावी 
 
प्रत्येक खेळाडूला शासकीय नोकरी देणे शक्य नाही, या साठी स्टार्टअप इंडिया मधून क्रीडासाहित्य तयार करणे, विकसित करणे यासाठी खेळाडूनच प्रोत्साहन देऊन व्यवसायाकडे वळवणे आणि आर्थिक मदतीसाठी, कर्जपुरवठा होण्यासाठी  बँकांना हमीपत्र देणे. तसेच साई प्रशिक्षण केंद्र , राज्यातले क्रीडा कार्यालये बालेवाडी , छ संभाजीनगर आणि इतर विभागीय क्रीडा संकुले, स्पर्धा यांना लागणारे क्रीडा साहित्य खेळाडूंच्या आस्थापना कडून खरेदी करून महामंडळा मार्फत दिले जावे आणि खेळाडूंना आर्थिक सक्षम बनवावे 
 असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे

या प्रस्तावाची प्रत माहिती साठी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखरजी बावनकुळे आणि
क्रीडा व युवक कल्याण,मंत्री 
महाराष्ट्र राज्य ना श्री गिरीशजी महाजन  यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत 

 या वेळी भा ज पा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर , जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष कृणाल मोरे उपस्थित होते.

Thursday, May 11, 2023

महाराष्ट्र सत्तासंघर्ष 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग ‘सर्वोच्च’ चा मोठा निर्णय; शिंदेगटाला दिलासा

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. *सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.* त्यामुळे हे प्रकरण अजून लांबणार असल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं वाचन केलं. यावेळी पाचही न्यायाधीश कोर्टात उपस्थित होते. आधी दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचं वाचन झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं वाचन केलं. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. नबाम रेबिया प्रकरणी अनेक गोष्टींची उत्तरं मिळालेली नाहीत. ही उत्तरे मिळायची बाकी आहेत. नबाम रेबिया प्रकरणातही ही उत्तरं सापडत नाही, असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

पक्षात फूट पडली हे अध्यक्षांना 3 जुलै रोजी कळलं होतं. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, असंही कोर्टाने म्हटलं आहे. तसेच मीच खरी शिवसेना असा दावा कुणी करू शकत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर
भरत गोगावले यांची प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. कोणत्याही कायदेशीर कार्यवाही शिवाय ही नियुक्ती करण्यात आली, असं कोर्टाने निकालात स्पष्टपणे म्हटलं आहे.

काय घडलं होतं?
एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात 15 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे सुरतला गेले होते. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर शिंदे यांना आणखी 24 आमदार येऊन मिळाले होते. दहा अपक्षांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला होता. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला होता. त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सरकार अल्पमतात असल्याचं सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यानंतर कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं होतं.

Wednesday, January 11, 2023

*जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या..**वाहतूक शाखेचे पो.नि.विठ्ठल शेलार यांची मसूर येथे बदली तर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजीत यादव वाहतूक शाखेत बदली*

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या..*
*वाहतूक शाखेचे पो.नि.विठ्ठल शेलार यांची मसूर येथे बदली तर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजीत यादव वाहतूक शाखेत बदली*
 *रॉयल सातारा न्यूज -* सातारा जिल्ह्यातील बावीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवार, दि. ११ रोजी सायंकाळी उशिरा झाल्या असून त्यामध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांचा समावेश आहे.
तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांची सातारा येथील जिल्हा वाहतूक शाखेत, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांची पाचगणी पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांची मेढा पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा येथील वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांची मसूर पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश गर्जे यांची भुईंज पोलीस ठाणे येथे प्रभारी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत  चौधरी यांची ढेबेवाडी पोलीस ठाणे प्रभारी, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांची तळबीड पोलीस ठाणे येथे प्रभारी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजीत यादव यांची सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेत प्रभारी,
ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांची सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांची सातारा येथील मानवी संसाधन पोलीस कल्याण येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना अमृत पोलीस ठाणे येथे मुदतवाढ मिळाली आहे.
पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखा, सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांची कराड शहर पोलीस ठाणे, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांची शाहुपुरी पोलीस ठाणे, वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची बोरगाव पोलीस ठाणे येथे प्रभारी, मेढा पोलीस ठाण्याचे अमोल माने यांची सातारा येथील सायबर पोलीस ठाणे, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांची फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, साताऱ्यातील नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभूते यांची कराड शहर पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांची पोलीस उपविभागीय कार्यालय वाई विभाग येथे वाचक, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांची सातारा येथील जिल्हा विशेष शाखेत, सातारा येथील भरोसा सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता दिनकर यांची सातारा तालुका पोलीस ठाणे आणि सातारा येथील नियंत्रण कक्षातील शाहीर पोलीस निरीक्षक आरती नांदेकर यांची सातारा येथील स्थागुशा अंतर्गत भरोसा सेल येथे बदली झाली आहे.
*बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा सबस्क्राईब लाईक व शेअर करा "रॉयल सातारा न्युज"*


Thursday, December 29, 2022

हिराबेन मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींनी घेतला आज अखेरचा निरोप....



                  रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


मोदी कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी आहोत  हिराबेन मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना अखेरचा निरोप दिला जाणार आहे व याची शंभरी त्यांनी पार केली होती आणि अतिशय अत्यंत चांगलं असं आरोग्य त्यांचं होतं वयाच्या 100 वर्षांपर्यंत पण आणि नुकताच वयाच्या 101 व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि 101 व्या वर्षातच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईचा शंभरावा वाढदिवसही साजरा केलेला होता त्यावेळी आपल्या आईप्रती त्यांचा जो भाव होता त्यांची जी कृतज्ञता होती किंवा आई प्रति त्यांच्या भावना होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या वयाच्या शंभराव्या वाढदिवशी आईचे पाय धुऊन ते पाणी पिलं होतं हा जो भाव होता या ज्या भावना होत्या संपूर्ण देशभरातनं त्यावर चर्चा त्यावर कौतुक झालेलं होतं आणि फक्त वयाच्या 100 व्या वर्षीच नाही तर नेहमीच प्रत्येक क्षणांमध्ये आईची सोबत ही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असायची आणि आज अखेर हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे.

Wednesday, December 28, 2022

सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी एका अपंग व्यक्तीस कुबड्या देऊन केली मोलाची मदत...

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी एका अपंग व्यक्तीस कुबड्या देऊन केली मोलाची मदत...

आज सकाळी पोवाई नाका सातारा येथे कर्तव्यावर असताना एक अपंग व्यक्ती एक पायावर उड्या मारत रस्ता क्रॉस करत असताना दिसून आला. त्यास थांबवून मदती करिता विचारपूस केली व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर बाबर रा शेणोली स्टेशन, ता कराड असे सांगून त्याचा सन 2012 रोजी रेल्वे अपघात झाला व त्यामध्ये त्याचा एक पाय गमावला असल्याचे सांगितले. तो कुबड्यांविना आजपावेतो एक पायावर चालत असून त्याची घरची परिस्थिती खूप नाजूक असलेने त्यास आजपर्यंत कुबड्या घेता येत नसलेचे समजले. तो कुबड्या घेण्यासाठी लोकांकडे मदत मागत असल्याने आम्ही *सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी मदत म्हणून कुबड्या घेऊन दिल्या आहेत.*

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...