Sunday, October 4, 2020

दिनांक. 04/10/2020. *जिल्ह्यातील 450 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 20 बाधितांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 450 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 20 बाधितांचा मृत्यु*

 

सातारा दि.4 (जिमाका):  जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 450 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  20 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 12, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ  2, भवानी पेठ 1, यादोगोपाळ पेठ 6, प्रतापगंज पेठ  7, केसरकर पेठ 2, राजसपुरा पेठ 1,  बसप्पा  पेठ 1,  व्यंकटपुरा पेठ 1, करंजे 3, शाहुपुरी 3,शाहुनगर 2,  भोसले मळा राधिका रोड 1, कामाठीपुरा 1, गडकर आळी 2,  गोडोली 3, कोडोली 2, कोंढवे 1, पाडळी 1, निसराळे 1, गजानन हौ. सो. 5, खोजेवाडी 1, चिंचिली 1, तरणे 1, ज्योतीबाची वाडी 1, मोळाचा ओढा 1, सदरबझार 3,गजवडी 1,वाढे 1, उतेकर  नगर 3, कुपर कॉलनी 1,पाटखळ 1, कारंडी 1, अव्दैत अपा. विश्व पार्क 1, शेरेवाडी 1, पळशी 1, भाकरवाडी 1, लिंब 1, पाटेघर 1, संभाजी नगर 2, सैनिक नगर 2, पिरवाडी 1, मुळीकवाडी 1, सासपाडे 2,नागठाणे 6, बोरगांव 1, फॉरेस्ट कॉलनी 1, गणेश कॉलनी 1,जालना 1,धावडशी 2, समथै नगर 2, तामजाई नगर 1,सोनगाव 1, नांदगांव 1, दौलतनगर 1, कालवडी 1, अतित 1,  गोलेश्वर 1,वडगांव 2, अपशिंगे शारदा क्लिनिक 3, आंबेडकर नगर 1, साई प्लाझा 1,

 

*कराड तालुक्यातील*  कराड 4 ,  सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 2, विद्यानगर 2,  मळवडी 1, बारमाची 1, टेंभू 2, साळशिरंबे 1,ओंढ 2, काले 7, कुसुर 1, धोंडेवाडी 4, वाठार 2, कालवडे 1, धुमाळवाडी 3, सुपने 2, नांदलापूर 1, मसुर 4,रेठरे खु. 2, हरपलवाडी 1, खोडशी 1, चचेगांव 1, मालखेड 1, पलुस 2, शेरे स्टेशन 1,कोयना वसाहत 1, वहागांव 1, मासोले 1, वडगांव 1, मलकापूर 7, तारगांव 2, मुंढे 1, वाडोळी निळेश्वर 1, अटके 3, कार्वे 1, शेरे 2, कार्वेनाका 1, घोणशी 2, घरेवाडी 1, ओगलेवाडी 1, विजयनगर 2, सह्याद्री हॉस्पिटल 1 , इंदोली 1, वाकन रोड 1, शिवनगर 1, गारवडे 1,  शिवाजीनगर 1, भावनवाडी 1,घोलेश्वर 1, जुनेखेड 1,

 

*फलटण तालुक्यातील*  फलटण 4 , बुधवार पेठ 2, रविवार पेठ 1, निरगुडी 1, मलवडी 1, कोळकी 5, मेटकर  गल्ली 1, साखरवाडी  1, जावली 2,मुजवडी 1, लक्ष्मीनगर 8, कुंटे 1, गोळीबार मैदान 1, धुळदेव 4, विढणी 10, पाडेगन 1, झिरपेवाडी 7, मुरूम 2, सासवड 1, दुधेबावी 1, मुंजवाडी 1, सस्तेवाडी 1, साते 4, तरडगांव 14

 

*वाई तालुक्यातील* वाई , रविवार पेठ 2, यशवंत नगर 1, लोहारे 1, गंगापूरी 1, भुईंज 3, अनेवाडी 1, एमआयडीसी 1, दत्तनगर 1, विजयवाडी 1, अनपटवाडी 1, खडकी 1, गुळुंब 1,

 

*पाटण  तालुक्यातील*  पाटण  4, धामणी 1, वडगांव 1, बांबवडे 1, बोडकेवाडी 1, भोसेगांव 1, कोयना नगर 1, तारळे 1, कालगांव 2, कडणे 1, कर्पेवाडी 1, मालदन 1,

 

*खंडाळा  तालुक्यातील*  खंडाळा 1, पाडळी 1, सुखेड 1, लोणंद 5,शिरवळ 1,

 

 *महाबळेश्वर तालुक्यातील*

 

*खटाव तालुक्यातील* खटाव 1, कातरखटाव 4, वडुज 5, नागनाथवाडी 2, तडवळे 1, मांडवे 1, जायगाव 1, चीतळी 1, मायणी 2,  नेर 5, निढळ 4, पुसेगांव 2, औंध 8, गणेशवाडी 1, वाडी 1, काळंबी 2, उंबार्डे 1, येरालवाडी 1, सिध्देश्वर कुरोली 2,

 

*माण  तालुक्यातील* म्हसवड 6, दहिवडी 1, पिंगळी बु. 1, भटकी 1, वरकुटे मलवडी 1,कुळकजाई 1,

 

*कोरेगांव तालुक्यातील* कोरेगांव 5, किरोली 1, भगतवाडी 1, देऊर 1,एकसळ 1, सांगवी 3, धुमाळवाडी 1, लासुर्णे 1, तासगांव 1, वाठार स्टेशन 2, बर्गेवाडी 1,  जांब 1, पिंपोडे 1, बोरीव 1, पिंपोडे बु. 1, रहिततपुर 2, किन्हई 1, कुमठे 2, वेळंग 1,

 

*जावली तालुक्यातील*  निझरे 2, ओझरे 5, मोहाट 1,  मेढा 3, केळघर तर्फ सोळशी 2, सोनगाव 1,सर्जापुर 2, मोरावळे 1,

 

*इतर* कुसंब 1, फडतरवाडी 2,

 

 *बाहेरील जिल्ह्यातील*   इस्लामपूर वाळवा सांगली 1, नातेपुते सोलापूर 1,सागांव शिराळा 1,

 

20 बाधितांचा मृत्यु*

 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या  शाहुपूरी सातारा येथील 20 वर्षीय महिला, तडवळ ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, वरदानगड ता. खटाव येथील 45 वर्षीय पुरुष, निढळ ता. खटाव येथील 90 वषी्रय पुरुष, विकासनगर ता. सातरायेथील 76 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयामध्य विटा ता. खानापूर सांगली येथील 80 वर्षीय महिला, मिरेवाडी त फलटण येथील 80 वर्षीय  पुरुष,  गोळीबार मैदान ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, रेठरे बु. ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गुंडे ता. कराड येथील 80 वर्षीय महिला, लावंडमाची ता. कराड येथील 82 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 72 वर्षीय पुरुष, खटाव येथील 61 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष, मडाली जांब बु. ता. कोरेगांव येथील 73 वर्षीय महिला, सोमवार पेठ ता. कराड येथील  82 वर्षीय पुरुष तर उशीरा कळविलेले जळगेवाडी ता. कराड येथील 47 वर्षीय पुरुष, डिगेवाडी ता. कराड येथील 32 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 79 वर्षीय पुरुष   अशा  एकूण 20 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

घेतलेले एकूण नमुने --  150024 

एकूण बाधित -- 39168

घरी सोडण्यात आलेले -- 29494

मृत्यू --  1234

उपचारार्थ रुग्ण – 8440.

Saturday, October 3, 2020

दिनांक.03/10/2020. *जिल्ह्यातील 371 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 371 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु*

 

सातारा दि.3 (जिमाका):  जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 371 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 20, सामवार पेठ 3, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1,  मल्हारपेठ 4, केसरकर पेठ 3, संभाजीनगर 2, बुधवार नगर 1, गोडोली 3, अजिंक्य कॉलनी 1, शिवथर 2, संगमनगर 4, विसावा नाका 3, शाहुपुरी  2, शाहुनगर 5, गोडोली 2 , पिरवाडी 1,   खेड 2, विकास नगर 2, क्षेत्रमाहुली 1, किडगांव 1, बोगदा 1, मोळाचा ओढा 2, वडुथ 1, करंजे 3, प्रतापसिंह नगर 1, शेंद्रे 4, यादोगोपाळ पेठ 1, पडळ 1, कोंडवे 1, कारी 1, पाटखळ 2, कामाठीपुरा 1, सातारा रोड 1, वनवासवाडी 1, वेण्णानगर 1, गोवे 1, देवकल पेट्री 1, वाढे 1, अतीत 1, तामजाईनगर 2, राधिका रोड 2, आसनगाव 3,  निनाम पाडळी 1, गोजेगांव  1, कुपर कॉलनी 1, संगममाहुली 1, लिंब 1, काशिळ 1, सदरबझार 3, कुस खु. 1, लिंब 1, वर्ये 1, सासपडे 2, कामथी 1, अक्षय कृपा हौ.सोसा. कृष्णानगर   1, विठ्ठलनगर 1, राधिका नगर विलासपुर 1,जरंडेशवर नाका 2, नेले 1, अंगापुर वंदन 1, सोनगांव 1, पंताचा गोट 1,

*कराड तालुक्यातील*  कराड 2, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, मसुर 1, चिखली मसुर 1, वडगाव हवेली 2, वाठार 1, कपील 2, विद्यानगर 5, शेरे 3, येवती चौक 1, बनवडी 1,बेलवडी 1, हेलगांव 1, नातोशी 1, इंदोली 2, राजापुरी 1, किवळ 1, मुंडे 1, कोपर्डे हवेली 2, शिरवडे उंब्रज 1, नांदलापूर 1, अटके 1, शहापुर 1, कोडोली 1, कार्वेनाका 2, चचेगांव 1, मार्केट यार्ड 1, साकुर्डी 1, कोर्टी 1, मलकापूर 3, नारायण वाडी 1, काले 1, खिंडवाडी 1, नेले 1, उंब्रज 1, शिवाजी हौसिंग सोसा 1, अने 1, घोणशी 1, गोवारे 1,

*फलटण तालुक्यातील*  फलटण 1, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, आदर्की 3, वाठार निंबाळकर 1, कुंभार गल्ली 2, ढवळेवाडी 1, दालवाडी 1, जावली 2, साखरवाडी 5,  तडवळे 2, होळ 1, वडजल 1, सारकल 1, सांगवी 5, झिरवेवाडी 1, साते 1, फडतरवाडी 1, फरांदवाडी 1,

*वाई तालुक्यातील* वाई 3, रविवार पेठ 3, धर्मपुरी 1, बावधन 5, एमआयडीसी 1,  मधली आळी 2, ब्राम्हणशाही 1, गुळुंब 1, जेजुरीकर कॉलनी 1, सह्याद्रीनगर 1, रामडोह आळी 1, मोधेकरवाडी 1, बोरगांव 1, ओझर्डे 1, भुईंज 1,

*पाटण  तालुक्यातील*  पाटण 2, भालेकरवाडी 1, तारळे 1, बांबवडे 1, चोपदारवाडी 1, ढेबेवाडी 2, तांबवे 1, उरुल 1,

*खंडाळा  तालुक्यातील* गावठाण शिवाजीनगर 1,लोणंद 2, पाडळी 1, पारगांव 1, ढवळेवाडी 1, शिरवळ 1,

 *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1, विल्सन पॉईंट 1, पाचगणी 1, ताईघाट  2,

*खटाव तालुक्यातील* खटाव 1,  डिस्कळ 3, बुध 2,  सिध्देश्वर कुरोली 1, मायणी  2, वर्धनगड 1, कटगुण 1, कातरखटाव 7, पाडळ 1, धोंडेवाडी 1, पाचवड 2,नेर 1, जांब 1, चितळी  2, दरेवाडी 2, दालमोडी 1, जाखणगांव 2,

*माण  तालुक्यातील* दहिवडी 2,टाकेवाडी 1, म्हसवड 2, दिवड 1, विरळी 1, कारंडवाडी 1, गोंदवडे बु. 1, सोकासन 1,

     *कोरेगांव तालुक्यातील* कोरेगांव 8,  फडतरवाडी 5, सुरली 2, वेळू 1, पाडळी 1, सासुर्वे 1, किन्हई 2, खेड 1, एकसळ 1, रहिमतपुर 1, भोसे 1, नांदवळ 1, पिंपरी 1, वाठार स्टेशन 1, शिढोळ 1,

*जावली तालुक्यातील*  खर्शी 1, कुडाळ 2, निझरे 1, ओझरे 1, केडांबे 1, भणंग 2, गावडी 11, कुडाळ 3, हुमगांव 2, मेढा 1, वहागांव 2, दाते खु. 1,

 *बाहेरील जिल्ह्यातील*   नातेपुते माळशिरस 1,महाड रायगड 1, अक्कलकोट सोलापूर 1, ठाणे 1,

 

27 बाधितांचा मृत्यु*

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या आसनगाव ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला, जांब ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, शिरवळ ता वाई येथील 84 वर्षी पुरुष, निजरे ता. जावळी येथील 50 वर्षीय पुरुष, देवुर ता. कोरेगांव येथील 89 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, निगडी वंदन ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी  रुग्णालयांमध्ये दहिवाडी ता. माण येथील 78 वर्षीय पुरुष, कायेना वसाहत ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, खटाव  येथील 52 वर्षीय पुरुष, सजुर ता. कराड येथील 73 वर्षीय पुरुष, मांडवे ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष, बांगरवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, कारंडेवाडी ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 65 वर्षीय महिला, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 53 वर्षीय पुरुष, दुधेबावी ता. फलटण येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 77 वर्षीय महिला, वडुज ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, राजसपुरा पेठ ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले करंजे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 69  वर्षीय पुरुष, कराड येथील 74 वर्षीय महिला, दत्तनगर ता. फलटण येथील 48 वर्षीय पुरुष  अशा  एकूण 27 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

घेतलेले एकूण नमुने --  148255 

एकूण बाधित -- 38718

घरी सोडण्यात आलेले -- 28655

मृत्यू --  1214

उपचारार्थ रुग्ण – 8849

Friday, October 2, 2020

दिनांक 02/10/2020/. 595 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

595 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि.2(जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 595 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 24, कराड 7, उपजिल्हा रुग्णालय फलटण 100, कोरेगाव 35,  खंडाळा 49, रायगांव 20, पानमळेवाडी 101, मायणी 24, महाबळेश्वर 24, दहिवडी 32, तलमावळे 35, म्हसवड 24 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  1. घेतलेले एकूण नमुने -- 146350
  2. एकूण बाधित -- 38347
  3. घरी सोडण्यात आलेले --- 28655
  4. मृत्यू -- 1187
  5. उपचारार्थ रुग्ण -- 8505

दिनांक. 02/10/2020. *जिल्ह्यातील 535 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg

   $ *रॉयल सातारा न्युज* $

 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


*जिल्ह्यातील 535 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 27 बाधितांचा मृत्यु*


सातारा दि.2 (जिमाका):  जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 535 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 


*सातारा तालुक्यातील* सातारा  32, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ , गुरुवार पेठ 6, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 4, रविवार पेठ 1, यादोगापाळ पेठ 1, केसरकर पेठ 5, व्यंकटपूरा पेठ 1,  मल्हारपेठ 3, प्रतापगंज पेठ 2, सदरबझार 6, करंजे 4, गोडोली 3, शाहुनगर 1, स्वरुप कॉलनी 1,  नटराज कॉलनी 1, ढोणे कॉलनी 1, गुलमोहर कॉलनी 1, मेघदूत कॉलनी 1, अजिंक्य कॉलनी 1,  शिक्षक कॉलनी 1,जाधव कॉलनी 1, रामाचा गोट 4, पोतदार स्कूलजवळ तामजाईनगर 1, सूर्वे प्लॉट 1, सह्याद्री पार्क गडकर आळी 3,  पंताचा गोट 2, करंजे पेठ 2, करंजे नाका 1,  गणेशनगर 1, विजय पार्क सदरबझार 1, रघूनाथ पुरा 2, बसाप्पा पेठ 1,  जुन्या न्यु इंग्लीश स्कूलजवळ 1, जुनी एमआयडीसी 1, सुमित्राराजे हौसिंग सोसायटी 1, रुद्रनील रेसीडन्सी संगमनगर 1, दत्तनगर 1, शिवाजीनगर 1, ठक्करसिटी 1, विकासनगर 1, सैदापूर 1, खेड 2, कर्मवीरनगर 1, अतित 1, अंगापूर 1, आंबळे 1, अंबवडे 1, बर्गेवाडी 1, भोंदवडे 1,  लिंब 3, आरफळ वडूथ 1, वडूथ 2,  पाटखळ माथा 1, पाटखळ 2, पानमळेवाडी 1, गोजेगाव 1, गोवे 1, जिहे 2, धावडी 1,  क्षेत्रमाहूली 1, मोही 1, साळवण मर्ढे 1, जरंडेश्वर नाका 1, वेचले 1, वनगळ 1, वर्णे 1, वाढे 1, वर्ये 3, शेंद्रे 2, शिवथर 2,  कण्हेर 1, भाटमरळी 1, म्हसवे 1, सोनगाव 1, चिंचणेर 2, चिंचणेर निंब 1, चिंचणेर वंदन 2, कोर्टी 1, कोडोली 2, नागठाणे 3, नागरारी 1, निगडी 2, निनाम पाडळी 1, पाली 1, तारळे 1, काशिळ 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 4, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोयना वसाहत 4, विद्यानगर 2,   शिवनगर 2, विजयनगर 1, सैदापूर 1, मलकापूर 3, आगाशिवनगर 4, हजारमाची 1, उत्तर तांबवे 1,  आटके 3, घोणशी 2,  इंदोली 1, कडोळी 1, कुरले 1, गोळेश्वर 1, पुणदी 2, जुळेवाडी 1, तांबवे 2, रेठरे बु.1, रेठरे हवेली 1,  पोतले 1,  वाघेरी 1, वडगाव 1, पाडळी केसे 2, उंब्रज 2, बेलवडे 1, चोरे 1, काले 2, कार्वे 1,  कोपर्डे 3, मुंढे 1,  नंदगाव 2, निगडी 2, तारगाव 1, वहागाव अहिरे 1, विंग 7, येळगाव 1, येणके 2, मसूर 4, आणे 1, वाघेश्वर 1, 


*फलटण तालुक्यातील* फलटण 16, शहरातील शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ , रविवार पेठ 2, महातपूरा पेठ 1, भडकमकरनगर 1, ब्राम्हणगल्ली 1, लक्ष्मीनगर 2, खाटीक गल्ली 1, पुजारी कॉलनी 2, हडको कॉलनी 1,  चौधरवाडी 2, दुधेभावी 1, नगरसोबानगर 1, वडगाव 1, झिरपवाडी 1, कोळकी 2, जिंती 1, पाडेगाव 1,  फडतरवाडी 2, साखरवाडी 2,  संगवी 1, सोनवडी 2, वडगाव 2, वालुथ 1, 

 

*वाई तालुक्यातील*  वाई 2, रविवार पेठ 2,  गंगापूरी 2,  यशवंतनगर 1, भूईज 3, राऊतवाडी 1, ओझर्डे 2, खानापूर 2, सोनगिरवाडी 1, बावधन 1, किकली 1, विरमाडे 1, पांडे 1, पसरणी 1, सुरुर 2, वेळे 1,  


*पाटण  तालुक्यातील*  पाटण 3, बुध 1, वाघेरी 1, साळवे 1, तारळे 1,  मल्हारपेठ 3, सोन्याचीवाडी 1, भोसेगाव 1, काळगाव 2, मुळगाव 1, नाटोशी 1, गुढे 1, मंद्रुपकोळे 2, 


*खंडाळा  तालुक्यातील* पळशी 1, बाळूपाटाचीवाडी 1, लोणंद 3, निंबोडी 1, पारगाव 2, शिरवळ 1, पिसाळवाडी 1, शिरवळ 2, पवारवाडी 2, 


*महाबळेश्वर तालुक्यातील* अवकाळी 6, मेटगुताड 1, 

*खटाव तालुक्यातील* खटाव 3, वडूज 7, उपळे 1, वाकेश्वर 1, कातरखटाव 10, नेर 1, निढळ 1,  पुसेगाव 5, पुसेसावळी 2,  विसापूर 2, साठेवाडी 3, औंध 1, 


*माण  तालुक्यातील* भालवडी 1, इंजबाव 2, माळवाडी 4, गोंदवले 1, लोधवडे 1, श्रीपळवण 1, वरकुटे 3,  म्हसवड 3, उकिरंडे 2, वावरहिरे 2, किरकसाल 1, दहिवडी 6, बिदाल 1, आंधळी 1, 

     

*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगाव 16, आसगाव 1, साप 2, आझादपूर 2, चंचळी 2, किन्हई 10, कुमठे 2, रुई 1, वाघोली 1,  खेड नंदगिरी 5,  अंभेरी 3, भाडळे 2, चिमणगाव 1,  देउर 1, धामणेर 1, कटापूर 1,  निगडी 1, पवारवाडी 1, पेठ किन्हई 1, रहिमतपूर 8, सातारा रोड 1, जळगाव 2,  फडतरवाडी 1, अंबवडे 2, तडवळे 1, भाकरवाडी 1, सुलतानवाडी 1, सासुर्वे 1, 


*जावली तालुक्यातील* कुडाळ 3, करवली 1, सर्जापूर 1, सावंतवाडी 2, सोमर्डी 3, बामणोली 1,  ओझरे 1, मेढा 1, भणंग 1, मोहाट 2, दुदुस्करवाडी 1, दरे बु. 1,  


*बाहेरील जिल्ह्यातील*  रेठरे (वाळवा-सांगली) 1, रेठरे हरणाक्ष (वाळवा-सांगली) 1, कडेगाव (सांगली)1, नागपूर 1, नाझरे 1, सासवड (पुणे) 1, 

 

*27 बाधितांचा मृत्यु*

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या खेड ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, धावडी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, किकली ता. वाई येथील 84 वर्षीय पुरुष, मदनेवाडी ता. पाटणी येथील 58 वर्षीय पुरुष, चाहूर ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष तर जिल्याष तील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या दहिवडी ता. माण येथील 57 वर्षीय पुरुष, कंजरवाडी देगाव, ता.सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका, ता.सातारा येथील 74 वर्षीय महिला, पिंपरी ता. कोरेगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 55 वर्षीय महिला,  सोनवडी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी ता. फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ ता. फलटण येथील 68 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 69 वर्षीयपुरुष, बिदाल ता. माण येथील 46 वर्षीय महिला, बोंडारवाडी ता. महाबळेश्वर येथील  58 वर्षीय पुरुष  तसेच  तसेच उशीरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथील कोर्टी ता. कराड येथील ६४ वर्षीय पुरुष, मोल ता. खटाव येथील ५४ वर्षीय पुरुष, निजरे ता. सातारा येथील ५३ वर्षीय पुरुष,  कासरशिंरबे ता.कराड येथील ७२ पुरुष, रविवार पेठ ता. कराड येथील ७० वर्षीय पुरुष, चिंचणी ता. कडेगाव सांगली येथील ५६ वर्षीय पुरुष, गोवारे ता. कराड येथील ८० वर्षीय महिला, चोरमारवाडी ता. कराड येथील ६५ वर्षीय पुरुष, जिंती औंध ता. कराड येथील ७२ वर्षीय पुरुष, विसापुर ता. खटाव येथील ८० वर्षीय पुरुष, गिरवी ता. फलटण येथील ७५ वर्षीय पुरुष अशा  एकूण 27 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


घेतलेले एकूण नमुने --  146350 

एकूण बाधित -- 38347

घरी सोडण्यात आलेले -- 28060

मृत्यू --  1187

उपचारार्थ रुग्ण – 9100

दिनांक. 02/10/2020.मायक्रो फायनान्सकंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधासक्तीच्या वसुलीविरुद्धकारवाई - जिल्हाधिकारी शेखर सिंह...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधा

सक्तीच्या वसुलीविरुद्ध कारवाई  - जिल्हाधिकारी शेखर सिंह

 

सातारा , दि. १ (जि मा का )- मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच, ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

      सध्याच्या कोव्हीड -१९ महामारीच्या अनुषंगाने केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लाॕकडाऊन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

    मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत काही ग्राहकांच्या तक्रारी आढळून येत आहेत. तर काही ग्राहकांना अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड  तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी १८००१०२१०८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

      मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली बाबतीत रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कंपन्यांनी ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा तक्रारीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.


Thursday, October 1, 2020

दिनांक. 1/10/2020. पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश / प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा - विजयकुमार राऊत ...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

 

सातारा दि.1 (जिमाका) : शासनाने राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारित सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश पारित केले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्रापत असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 1.10.2020 रोजीच्या 00.00 वा. पासून ते दि. 31.10.2020 रोजीच्या 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.   

 

 सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करणेत येत आहेत.

 

1) सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंन्स्टिट्युट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन/ अंतराचे शिक्षणास परवानगी राहील.

2) चित्रपट गृहे. जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील), बार, सभागृह, असेंब्लीहॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.

3) रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास  किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील.  

4) सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.

5) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करणेत येत आहे.

6) सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यासांठी बंद राहतील. तथापि, सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील. तथापि, तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.

 

सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील.

 

1) दिनांक 5 ऑक्टोवर 2020 पासून हॉटेल / फुड कोर्टस्/रेस्टॉरंट्स आणि बार्स यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

2) ऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे.

3) राज्य व केंद्र शासनाने कोव्हिड 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्ठाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यंत प्रवास मुभा राहील.

4) सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत.

5) सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करण्यासाठी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. या कार्यालयाकडील दि.26/06/2020 मधील आदेशाचे अटी व शर्तीचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

6) अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील.

7) वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात येत आहे. (घरपोच वितरणासह)

8) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिलाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.ने.आ/कावि/157272020 दि. 27/06/2020 मधील अटी व शान्वये चालू ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे.

9) सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.ने.आ/कावि/1477/2020 दि. 11/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये  चालू ठेवण्यास परवानगी राहील.

10) सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी आहे.

11) अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी  देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.

 

कोबिड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे

पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक/फौजदारी कारवाईस पात्र राहील.

 

1) सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तीवर 500/- रु दंड आकारावा.

2) सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी धुंकणेस मनाई असून, धुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा

3) दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झालेस रु.500/- दंड आकारावा. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 1000/- दंड आकारावा. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्नेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे.

  शहरी भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु. 1000/- दंड आकारावा. शहरी भागात दुसऱ्यांदा उल्लंघन

झालेस र.रू. 2000/- दंड आकारावा. व शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या

आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.

4) जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणान्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

 कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

 

1) शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.

2) कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. THERMAL. SACNNING. हँडवॉश, सॅनिटायझर, याची  ENTRY POINT व EXIT POINT वर व्यवस्था करावी.

3) कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.

4) औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

 

आरोग्य सेतु अॅप चा वापर - जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे अॅप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.

                 मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडीला आदेश क.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 31/08/2020 मधील Annexure | मध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहिर करणेचे अधिकार INCIDENT COMMANDER म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील. हा आदेश CONTAINMENT ZONE वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच CONTAINMENT ZONE बाबत त्या त्या क्षेत्रातील INCIDENT COMMANDER यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच CONTAINMENT ZONE INACTIVE झालेनंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील, तसेच  भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONEजाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतियंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.

                कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडीलआदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 31/08/2020 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 00000


प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

     - विजयकुमार राऊत

 

सातारा दि.1 (जिमाका):  कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपीकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान अधारीत फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ मधील अंबिया बहारातील डाळींब, द्राक्ष, केळी व स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश यामध्ये करणेत आला आहे. दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतक-यांना भेट देऊनस्ट्रॉबेरी पीकाबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील शेतक-यांनी स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश फळपीक विमा योजनेत करणेची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कृषि विभागास दिले होते. कृषि विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पीकाचा समावेश या योजनेत करणेत आला आहे.

या  योजनेमध्ये सन २०२०-२१ पासून काही बदल केले असून सदर योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. शेतक-यांनी फक्त ५ टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे.

 कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येईल. शेतक-यांनी ज्या शेतातील अधिसूचित फळपिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा ७/१२ उतारा व खाते उतारा (८ अ) घेऊन आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरणेची व्यवस्था करणेत आली आहे. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पिक असल्याचा स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.

अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे अधिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन करणेत येत आहे. योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरणेविषयी  तसेच अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. विजयकुमार राऊत यांनी केलेले आहे.

0000

माजी सैनिकांनी आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि.1 (जिमाका):  माजी सैनिक, विधवांच्या इयत्ता 1 ली ते 11 वी तील पाल्यांना (हवालदार रँक पर्यंत) व ज्या माजी सैनिक विधवांच्या (हवालदार रँक पर्यंत) मुलींचे विवाह 22 सप्टेंबर 2019 नंतर झाले आहे, त्यांना केंद्रीय नवी दिल्ली यांच्यामार्फत आर्थिक मदतीचे अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दिनांक. 01/10/2020. जिल्ह्यातील 512 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 20 तर बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 512 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 20  तर बाधितांचा मृत्यु
सातारा दि.1 (जिमाका):  जिल्ह्यात काल बुधवारीरात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 512 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 20  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 18, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 6,  सदरबझार 10, व्यंकटपुरा पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, केसरकर पेठ 5, प्रतापगंज पेठ 1, चिमणपुरा पेठ 2, गोडोली 6, शाहुनगर 4, शाहुपरी 1, कोडोली 2,  बारवकरनगर 1,  पिरवाडी 2,  देगाव पाटेश्वर 1, बसाप्पाचीवाडी 1, खेड 3, क्षेत्र माहुली 1, बर्गेवाडी 1, नेले 1, शेंद्रे 1, देगाव तांबे 1, लिंब 2, किडगाव 2, जैतापुर 1,  गोळीबार मैदान 1, मल्हार पेठ सातारा 2, भवानी पेठ सातारा 1, गोजेगाव 1,  बसाप्पा पेठ सातारा 1, वाढे 4, पाटखळ 2, अंगापुर 1, अंगापुर वंदन 1, कामाटी पुरा सातारा 1, कोंढवे 2,  देगाव 1, वनवासवाडी 1, आरफळ 1, राधिका चौक सातारा 1, प्रतापसिंहनगर सातारा 1,  नागठाणे 2, चिंचणेद वंदन 1, गेंडामाळ सातारा 1, देगाव 1, नुने 1, करंजे नाका सातारा 3,  
 कराड तालुक्यातील कराड 4,  शनिवार पेठ 7, सोमवार पेठ 1,  मलकापूर 2, सैदापूर 2,  विद्यानगर 2, बनवडी 2, वडगाव 2, भोसगाव 2, कोयना वसाहत 3, उंडाळे 1, केडगाव 1, वाकुरडे बु 1, अने 1, कापील 1, अटके 1, ओगलेवाडी 2, वहागाव 2, मसूर 10, कोळेवाडी 1, पोटले 1, वारुंजी 2, मार्केट यार्ड कराड 1, पार्ले 1, टेंभु 1, नंदगाव 1, साळशिरंबे 1, कोपर्डे 1, कार्वे नाका 1, वाघेश्वर 1, घोलपवाडी 1, यशवंतनगर 2, बेलवडे बु 1, वाखन रोड 1, जिंती 1, तारगाव 2, पाडळी केसे 2, वडगाव हवेली 2,नडशी 1, वाघेरी 1, उंब्रज 1, तावडे 1, शेरे 1, दुशेरे 1, शेनोली 1, हजारमाची 2, विंग 1, रेठरे खु 1, वसंतगड 1,  बेलवडे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 4, शुक्रवार पेठ 3, धुळदेव 3, अधरुढ 7, खटकेवाडी 1, वाढळे 2, झिरपेवाडी 2, निंभोरे 3, तिरकडवाडी 1, चौधरवाडी 1, मेटकरी गल्ली 1, निढणी 1, माथाचीवाडी 1, जाधवाडी 1, गोळीबार मैदान 1, साठेफाटा 1, धुमाळवाडी 1,  गुणवरे 8, साखरवाडी 1, फडतरवाडी 2, तरडगाव 1, तडवळे 1,
वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 3, फुलेनगर 2, बावधन नाका 1,  किकली 3,  गणपती आळी 2, विरमाडे 1, सह्याद्रीनगर 2, ओझर्डे 1, आनंदपुर 2, पसरणी 4, बोपर्डी 7, भुईंज 6, गुळुंब 1, वैराटनगर 2, बोपेगाव 3, विजयवाडी 1, शहाबाग 1, मेणवली 1, वेळे 3, बलकवडी 1, बावधन 2, जांभ 1, शिवथर 1, केंजळ 1,चिखली 1, खानापुर 2, ब्राम्हणशाही 2,  
पाटण  तालुक्यातील पाटण 4,  तोमसे 1, सुलेवाडी 1, मल्हार पेठ 3, सोनाईचीवाडी 1, वुरुल 2, सागवड 1, बनपुरी 1, कुंभारगाव 1, निवडे 1, लोरेवाडी 1, खेलगाव 1,  गव्हाणवाडी 1, पापर्डे खुर्द 1,    
खंडाळा  तालुक्यातील शिरवळ 1, मोरवे 1, शिंदेवाडी 1, लोणंद 3, निंबोडी 1,
 खटाव तालुक्यातील वडूज 4, पुसेगाव 6, धोंडेवाडी 2,   ललगुण 1, शिंदेवाडी 1, विसापूर 3,पाडळ 1, मायणी 1, औंध 4, कोकराळे 2, अंबेशी 1, पुसेसावळी 1, निढळ 7, रावठाणा 1, अंभेरी 1,  
माण  तालुक्यातील म्हसवड 9, दिडवाघवाडी 2, पळशी 1, मलवडी 1, शिंगणापूर 2, वडजल 3,हिंगणी 1, देवपुर 1,  वावरहिरे 1, दहिवडी 7, आंधळी 1, कुळकजाई 1,माळवाडी 1, मोही 1, बीदाल 1,पिंगळी बु 1, पांघारी 1, लोधवडे 1, बोधे 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13,  पिंपळे बु 1, कामेरी 4, अनपटवाडी 1, रहिमतपूर 11, धामणेर 1, भिवडी 1, वाटार स्टेशन 2, बोबडेवाडी 1, खोकडवाडी 1, मंगळापुर 1, किन्हई 3, तांबी 1, वेळु 1, दुघी 1,
जावली तालुक्यातील हुमगाव 1, सायगाव 4, सोमर्डी 4, मेढा 1, मोरघर 1, कुडाळ 6, ओझरे 10, मेढा 1, करंजे 8,  
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, मेटगुटाड 13, भोसे 1, अवकाळी 1, गोडोली 1, पाचगणी 2,
इतर मार्ड मोरे सोनगाव 1, पवारवाडी 1,पिपरी 1,रावडी 2,
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1, किल्ले मच्छींद्रगड 1, नातेपुते 1, पुणे 1,  
* 20 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये गोडोली सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, सासपडे सातारा येथील 76 वर्षीय महिला, कोळोशी अंबवडे सातारा येथील 96 वर्षीय महिला, बोपर्डी वाई येथील 45 वर्षीय पुरुष, तारळे पाटण येथील 70 वर्षीय महिला, पांडे वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पाल सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, बेबलेवाडी सातारा येथील 63 वर्षीय महिला, पारगाव येथील 70 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पलटलमध्ये मल्हार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, कुडाळ जावली येथील 65 वर्षीय महिला, कुळकजाई माण येथील 69 वर्षीय महिला, वाडोली कराड येथील 63 वर्षीय पुरुष, लवंगमाची वाळवा जि. सांगली येथील 62 वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनी सातारा येथील 69 वर्षीय महिला तर उशिरा कळविलेले शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, येवती कराड येथील 34 वर्षीय पुरुष, उंब्रज कराड येथील 62 वर्षीय पुरुष असे एकूण 20
 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने --144278  
एकूण बाधित --37812  
घरी सोडण्यात आलेले --27458  
मृत्यू --1160  
उपचारार्थ रुग्ण --9194

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...