Friday, September 4, 2020

दिनांक 04/09/2020. खासगीप्रवासी बसेस यांनी केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमितकेलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालल करावे- संजय राऊत...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

खासगी प्रवासी बसेस यांनी केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने

निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालल करावे

- संजय राऊत

सातारा दि.3 (जिमाका):  राज्य शासनाच्या कोविड-19 संदर्भातील अनलॉक मोहिमे अंतर्गत दिलेल्या सुधारित सुचनेनुसार आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निबंध हटविण्यात आला असून सदर प्रवासासाठी आता वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतू आंतरजिल्हा वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेस यांनी अंमलात आणावयाची मानक कार्यपध्दती शासनाने जाहीर केली असून  खाजगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालल करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी केले आहे.

 

 महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 20(1)(x) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बस चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या

प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. तसेच कंत्राटी बस चालकाने प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे.

बसेच आरक्षण कक्ष / कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचा-यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसचे प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाश्यांच्या वापरासाठी काही अतिरिक्त ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणा-या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारची कोविड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास अशा प्रवाशांना बसमधुन प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. 

कंत्राटी बस सिटींग वाहनांमध्ये प्रवासी एक आड एक पध्दतीने आसनस्थ होतील अशाप्रकारे प्रवासी वाहतुकीस परवानगी असेल. स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थवर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल. चालकाने प्रवासा दरम्यान जेवण / अल्पोपहार / प्रसाधन गृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ती ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खान-पानाकरिता व प्रसाधन गृहाच्या वापराकरिता प्रवासा दरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारिरीक अंतर पाळतील याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देऊ नये, त्यांना कचरा कुंडीचा वापर करण्याच्या व बस स्वच्छ राखण्याच्या सुचना द्याव्यात.

प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्यांचे अभिलेखन ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टिकोनातून उपरोक्त सुचना / कार्यपध्दतीत आवश्यकतेनुसार

सुधारणा करण्यात येईल. सदर बाबींची नागरिक व बस वाहतुकदार यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येते. सर्व खाजगी प्रवासी बस वाहतुक परवाना धारकांना सुचित करण्यात येते की, वरील सूचनांचे पालन न केल्यास परवाना धारकाविरुध्द मोटार वाहन अधिनियम 1988, केंद्रीय मोटार वाहन निरयम 1989, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

Thursday, September 3, 2020

दिनांक 03/09/2020. *870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*870 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 682 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून आज संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76,  पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49,  खावली 41,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

घेतलेले एकूण नमुने --   47347

एकूण बाधित --  15960

घरी सोडण्यात आलेले ---  9021

मृत्यू -- 443

उपचारार्थ रुग्ण -- 6496

दिनांक 03/09/2020. कोरोनारुग्णांसाठी जिल्ह्यातील बेड उपलब्धतेची माहिती देण्यासाठी तात्काळ ॲप तयार करावे* *- पालकमंत्री बाळासाहेबपाटील*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यातील बेड उपलब्धतेची माहिती देण्यासाठी तात्काळ ॲप तयार करावे* 

*- पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

सातारा दि.3 (जिमाका):   जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे.  कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी एक अॅप तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या.

                कोरोना संसर्गाबाबत करत असलेल्या उपाययोजना आढावा  बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.

                छत्रपती शिवाजी संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय  लवकरात लवकर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येईल यासाठी कामांचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या संबंधित तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

                  तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांच्या प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना कोरोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज द्यावी. ज्यांना कोरोनाचा संसर्ग नाही इतर आजारांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत अशा रुग्णांना काही रुग्णांलयाकडून उपचार केले जात नाहीत त्यांना उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी संग्रालयात उभारण्यात येणारे कोविड रुग्णालय तीन आठवड्याच्या आत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करावी, असे आवाहन  गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बैठकीत केले.

                जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यांच्या उपचार करण्यासाठी निवृत्त झालेल्या डॉक्टरांची मदत घ्यावी. ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, अशा रुग्णांच्या घरात व्यवस्था होईल का याची पाहणी करुन त्यांना घरातच उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना द्यावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.

                जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेडची माहिती ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी एक कक्ष स्थापन करावा, अशा सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी केल्या तर फलटण तालुक्यासाठी आमदार फंडातून व्हेन्टिलेटर उपलब्ध करुन द्यावा, असे  आमदार दिपक चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.

                  छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250  बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात कोण कोणत्या सुविधा असणार आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.               

                बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी संग्रालयात उभारण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.


03/09/2020. *जिल्ह्यातील 713 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 13 नागरिकांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 713 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 13 नागरिकांचा मृत्यु*

सातारा दि.3 (जिमाका):  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 713  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेततर 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

*कराड* तालुक्यातील कराड 23, शनिवार पेठ 15, सोमवार पेठ 7, शुक्रवार पेठ 3, मंगळवार पेठ 4,  कार्वे नाका 2, रुक्मिणी नगर 1,  मलकापूर 16, आगाशिवनगर 4, भवानी नगर 1, यशवंत नगर 1, कोयना वसाहत 1, श्रद्धा क्लिनीक 3, सुपर मार्केट 1,   वाठार 1, वारुंजी 1, उंब्रज 5, साकुर्डी 5, काले 1, रेठरे 2, कार्वे 3, तांबवे 17, वाटेगाव 1, सुपने 1, वहागाव 1, कपील 3, शेरे 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 1, नांदगाव 1, मोहपारे 1, येणपे 1,  रेठरे बु 8, पार्ले 3, वडगाव 4, रीसवड 1, शेनोली 1, भरतगाव 2, हेळगाव 1, गोळेश्वर 1, विजय नगर 3, मसूर 7, गमेवाडी 1, केसे 1, खुबी 1,  साळशिरंबे 1, येळगाव 4, पाल 1,  मालखेड 1, विद्यानगर 3, वाघोशी 1, उपजिल्हा रुग्णालय 1, वडगाव हवेली 1,  करवडी 1, कोडोली 2, गोसावेवाडी 2, वाण्याचीवाडी 1, आटके 1, खर्शी 1, मुंडे 1, विंग 1, गोटे 1, वाघमोडेवाडी 1, वारुंजी 2, कोनेगाव 3, रुक्मिणी गार्डन 1,  घोनाशी 1, सैदापूर 1, शिरवडे 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1,

*सातारा* तालुक्यातील सातारा 9,  गुरुवार पेठ 4, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 2,   शुक्रवार पेठ 1,  यादवगोपाळ पेठ 1, शाहुपूरी 6, गोळीबार मैदान 4,  संभाजीनगर 4, बॉम्बे रेस्टॉरंट 1, कृष्णानगर 2, चिमणपुरा पेठ 1, सदरबझार 3, करंजे 5, सैदापूर 1, शाहुनगर 1, गोडोली 5, कोडोली 3, खेड 1, सम्राट मंदिर शेजारी 1, तामजाईनगर 1, कुसावडे 1, शेंद्रे 2, संगमनगर 1,  शेळकेवाडी 1, बारवकर नगर 1, मोरेवाडी 1, पोगरवाडी कारंडी 1, झेडपी कॉलनी 1, मल्हार पेठ 1, केसरकर पेठ 1, खिंडवाडी 1, डबेवाडी 1,

 

*पाटण* तालुक्यातील पाटण 2,  नेर्ले 1, चाफळ 1, ढेबेवाडी 1, मारुल हवेली 1,निसरे 1, बोपोळी 2, बाचोळी 1, मल्हार पेठ 2, सोनाईचीवाडी 1,

 

*फलटण* तालुक्यातील फलटण 1, बरड 5, तरडगाव 2, ढवळ 1, गिरवी नाका 3, कोळकी 5, मंगळवार पेठ 3, साखरवाडी 3, शिवाजीनगर 1, निंभोरे माळी अळी 1, लक्ष्मीनगर 3, सासवड 1, गिरवी 1, मिरगाव 1, मिरेवाडी 1, जाधवाडी 1, कसबा पेठ 1, निंबळक 1, होळ 1, सोनवडी 1, जिंती 1, बुधवार पेठ 1, रिंग रोड 1,

 

*वाई* तालुक्यातील रविवार पेठ 1,  गंगापुरी 1, ब्राम्हणशाही 3, गणपती आळी 4,  शहाबाग 2, पांडेवाडी 3, पसरणी 1, धर्मपुरी 1, कवठे 1, बोपेगाव 1,  गरवारे वॉल 4, यशवंतनगर 2, आसले 1, बावधन 3, सोनगिरीवाडी 2, वारुड 1, गुळुंब 1,

 

*खटाव* तालुक्यातील खटाव 1,  पुसेगाव 3, वडूज 2, मायणी 1, विसापूर 1, औंध 2, पुसेसावळी 6, चोराडे 1,  गणेशवाडी 1

 

*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 1, तडवळे 1, त्रुपुटी 1, वाठार स्टेशन 1, कटापुर 1, एकंबे 1,  ल्हासुर्णे 1, देवूर 1, 

 

*खंडाळा* तालुक्यातील निंबोडी 1, लोणंद 7, खंडाळा 1, पळशी 1, विंग 1, शिरवळ 1, शिंदेवाडी 1, बाधे 2,  

 

*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 2,  

 

*माण* तालुक्यातील वडगाव 1, किरकसाल 1, म्हसवड 1, दहिवडी 6, नेर 1, शिंदी बु 1,

 

*जावली* तालुक्यातील मेढा 41, बीबवी 1,

 

*इतर* 12

 

बाहेरील जिल्ह्यातील शिराळा 1, कासेगाव जि. सांगली 2, इस्लमापूर 4, बीचिड ता. वाळवा 1, पनवेल 1, बोरगाव ता. वाळवा 1,

 

                *क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय* सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये  

                *सातारा तालुक्यातील सातारा 4, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, बाबर कॉलनी करंजे 4, गुरुवार पेठ 5, दुर्गा पेठ 5, कोडवे 1, प्रतापसिंहनगर 13, तामजाईनगर 7, चिखली 1,  नुने 1, शाहुपूरी 2, खोजेवाडी 1, वनवासवाडी 1, अडकर आळी 2,  शाहुपरी 2,  संगमनगर 1, सीटी पोलीस लाईन 3, जाधव कॉलनी 1, मोळाचा ओढा 1, पोलीस लाईन 1,  गोडोली 1, कारंडवाडी 1, क्षेत्र माहुली 1, देगाव 1, सदरबझार 1

                *जावली* तालुक्यातील बिभावी 5, मेढा 10, भोगावली 1,  भिवडी 5, भनंग 2, अंबेघर 2, भोगावली 5, 

                *पाटण* तालुक्यातील 5, ढेबेवाडी 3, सणबुर 3, नाईकबा 2, कालगाव 1, शिबेवाडी 1, नांदोशी 3, मारुल हवेली 1,

 

                *कराड* तालुक्यातील कराड 4,  रविवार पेठ 2,  मंगळवार पेठ 2, , शनिवार पेठ 2,  आगाशिवनगर 3, कोपर्डे हवेली 2, करवडी 2, येळगाव 1,  किवळ 10, कोल्हापूर नाका 1, कुंभारगाव 1, रेठरे बु 1, वारुंगी 1, उपजिल्हा रुग्णालय 1, कोर्टी 2,  करवडी 1, पाली 1,

                *खटाव* तालुक्यातील पुसेसावळी 12, अंबवडे 1, निमसोड 7, नांदवळ 3, कातरखटाव 1, वडूज 5,

                *महाबळेश्वर तालुक्यातील संभाजीनगर पाचगणी 1,  पाचगणी 2, अमरावती 2, मनोवरा हौसिंग सोसायटी 3, टीएचओ ऑफीस 2, वाडा कुंभरोशी 5,

                *फलटण* तालुक्यातील म्हावशी 1,

                *वाई* तालुक्यातील वाई 1,

                *खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, भाटघर 2, फुलोरा शिरवळ 4, म्हावशी 1, अहिरे 1, विंग 1, पळशी 1, लोणंद 1, बावडा 1, सम्राट कॉलनी शिरवळ 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1,  पळशी 10,

* 13 बाधितांचा मृत्यु*

                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  आवर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय महिला, खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोडवे येथील 60 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, चिंचली ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 42 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, कटापूर ता. कोरेगाव येथील 57 वर्षीय पुरुष, उचिले ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये संभाजीनगर, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, राहोळी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 67 वर्षीय महिला असे एकूण 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 

 

घेतलेले एकूण नमुने --   46665

एकूण बाधित -- 15960  

घरी सोडण्यात आलेले --- 8151    

मृत्यू --  443

उपचारार्थ रुग्ण -- 7366   

Wednesday, September 2, 2020

दिनांक 02/09/2020. *जिल्ह्यातील 589 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 16 नागरिकांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 589 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 16  नागरिकांचा मृत्यु*

*सातारा दि.2 (जिमाका):* जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*कराड* तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, सोमवार पेठ 5, रविवार पेठ 2,   मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शिवाजीनगर 1,   श्री हॉस्पीटल 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 4, आगाशिवनगर 6, मलकापूर 6,  कापेर्डे हवेली 8, वाखाब 1, केदारवाडी 1, वाखन 1, रेठरे  बु 1,मुंडे 2, पेर्ले 4, खुबी 1, ओंड 1, वडगाव 2, श्रद्धा क्लिनीक 1, घानोशी 1, कपील 1, उंब्रज 4,  गोळेश्वर 1, शिरवडे 1, वडगाव 1, आटके 1, केसेगाव 1,  बनवडी 3 कार्वे 2, विद्यानगर 1, दुशेरे 1, हरपळवाडी 1, शिरवडे 1, करवडी 2,  वडगाव हवेली 2, बेलवडे बु 2, गोळेश्वर 2, कोडोली 1, येरवळे 1, विरवडे 1,  पाल 7, रेठरे खु 4, उंडाळे 1, नारायणवाडी 1, काले 4, कर्वे नाका 1, सुपने 1, गमेवाडी 1, नंदगाव 1, वारुंजी फाटा 2, चव्हाण नगर वारुंजी 1, मार्केट यार्ड कराड 1, *सातारा* तालुक्यातील सातारा 31, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, रविावार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  बुधवार पेठ 1,  मल्हार पेठ 1,  एलआयसी ऑफीस क्वार्टर पोवई नाका 1,  संभाजीनगर 5, विलासनगर 1,  गोवे 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 4, करंजे पेठ 3, सदरबझार 7, संगमनगर 1, व्यंकटपुरा पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, विलासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 2, शाहुनगर 1,  शाहूपुरी 6, गोडोली 1, बापुजी साळुंखे नगर कोडोली 1,    नागठाणे 1, शेळकेवाडी 1, गुलमोहर कॉलनी 1, आयटीआय रोड, सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, गोळीबार मैदान सातारा 2, खेड 1, पळशी 1, लिंब 1, नेले किडगाव 1, नेले 1, बसाप्पाचीवाडी 4, कामेरी 1, चिंचणेर वंदन 2, सोनगाव 1, जरंडेश्वर नाका, सातारा 1, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, भरतगाव 1, पार्ली 1, 
*पाटण* तालुक्यातील पाटण 3, मारुल 1, रामपूर 1, अवर्डे 2, तारळे 1, दुताळवाडी 4, होळ 1, तळमावले 1,  
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 5,  बुरुड गल्ली 5, ऐकंबे रोड 6, रहिमतपूर 1, वाठार किरोली 4, व्यापार पेठ 6, जांब 2, शिवाजीनगर 1, नंदगिरी 1, चिमणगाव 8, वाठार स्टेशन 1, करंजकोप 5, पिंपोडे बु 1, आनपटवाडी 1, चौधरवाडी 5, बर्गेवाडी 1, पाडळी 1, कोया 1, ल्हासुर्णे 1, कटापूर 2, रहिमतपूर 3, साप 1, 
*माण* तालुक्यातील म्हसवड 18,  इंजबाव 1, मार्डी 1,  राणंद 3,  माण 1, दहिवडी 1, वडगाव 2,  बिदाल 1, कुळुकजाई 1, 
*खटाव* तालुक्यातील मायणी 18,  वडूज 13, गणेशवाडी 2, पुसेसावळी 2, पळशी 1, गुरसाळे 1, बुध 1, पुसेगाव 1, पुसेगाव 1, औंध 3,  
*फलटण* तालुक्यातील फलटण 7, बुधवार पेठ 2, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,  मलटण 3, मुंजवाडी 3, कोळकी 2, शुक्रवार पेठ 3, निरगुडी 7, सासवड 1,  राजाळे 1, झिरपवाडी 2, सस्तेवाडी 2, पवार वस्ती विडणी 1, पिप्रद 1,  साखरवाडी 1, विडणी 1, कसबा पेठ 1, बोराटे वस्ती पिपरद 1, बरड 2,  जिंती 1,  आसू 1, 
*खंडाळा* तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ 5,  तालीम चौक शिरवळ 5,  पिसाळवाडी 1, शिरवळ 6,  शिंदेवाडी 1,  न्यु कॉलनी शिरवळ 1, फुलेमळा 2,  स्टार सिटी शिरवळ 1, पाडेगाव 5, बीरोबा कॉलनी शिरवळ 1,  खंडाळा 1, देवघर 1,  लोणंद 8, बाधे 2, धनगरवाडी 1, पाडेगाव 1,  पाडेगाव 1, 
*महाबळेश्वर* तालुक्यातील गोडोवली पाचगणी 15, पाचगणी 1, संभाजीनगर 1, नगरपालिक 2, एमटीडीसी 1,  देवळाली 1,  वालवने 2, रांजणवाडी 4, नगरपालिका सोसायटी 1, 
*वाई* तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, गंगापुरी 2, सोनगिरीवाडी 1, यशवंतनगर 1,  भुईंज 1, कवटे 7, केंजळ 1, गरवारे वॉल एमआयडीसी 1, रविवार पेठ 3, धनगवाडी एमआयडीसी 1, उरमोडे 1, शेंदूजर्णे 1, ब्राम्हणशाही 1, 
*जावली* तालुक्यातील दारे खुर्द 1,  अंबेघर 1, 
*इतर* 12
बाहेरील जिल्ह्यातील मालगाव जि. सांगली 1, वाळवा जि. सांगली 1, नाडे सिटी, पुणे 1, इस्लमापूर 2, पेठ जि. सांगली 1, कोल्हापूर 1,  किल्लेमच्छींद्र ता. वाळवा 1, तांबवे ता. वाळवा 2 
*16 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे बुध ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष, माची पेठ सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड येथील 74 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 60 वर्षीय पुरुष. तसेच जिल्याकोतील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठ वाई येथील 62 वर्षीय महिला, शेंदूजर्णे ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई येथील 78 वर्षीय पुरुष, रामडोह आळी वाई येथील 60 वर्षीय महिला, गंगापुरी  वाई येथील 83 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 53 वर्षीय महिला, भवानी पेठ सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 16 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --   45723
एकूण बाधित --  15247
घरी सोडण्यात आलेले ---   7778
मृत्यू --  430
उपचारार्थ रुग्ण --   7039
00000

Tuesday, September 1, 2020

दिनांक 02/09/2020. साताऱ्यात उभं राहणार 250 बेडचे कोविड हॉस्पिटल ; आज पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्याकडून पाहणी...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
साताऱ्यात उभं राहणार 250 बेडचे कोविड हॉस्पिटल ; आज पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्याकडून पाहणी

सातारा दि.1 (जिमाका):  सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पहाणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.
या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 7 ते 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे, कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250 बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली आहे. या कोरोना रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 200 ऑक्सीजन बेड व 50 आयसीयुबेड असणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या सर्व सुविधा  उपलब्ध करुन द्या, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी मंजूर करण्यात आलेल्या 250 बेडेचे कोरोना रुग्णालयांचे काम तातडीने करुन लवकरात लवकरत पूर्ण करून वापरात येईल त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी या  पाहणी प्रसंगी केल्या.
कोरोनाची भिती बाळगू नये पालकमंत्री यांनी केले जनतेला आवाहन
गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढली आहे.  कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी जनतेनही घाबरुन न जाता कोरोनाचा खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे.
मला 14 ऑगस्ट रोजी त्रास जाणवू लागल्यामुळे माझी कोरोनाची चाचणी केली. माझा अहवाल पॉझिटिव्ह आला,  मला कुठलाही त्रास जाणवत नव्हता. आज मी 14 दिवसानंतर पूर्णपणे बरा झालो आहे. तुमच्या सेवेत रुजू झालो आहे. जनतने कोरोनाला न घाबरता खंबीरपणे मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

दिनांक 01/09/2020. जिल्ह्यातील 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 17 बाधित नागरिकांचा मृत्यू...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

जिल्ह्यातील 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 17 बाधित नागरिकांचा मृत्यू

सातारा दि. 1 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 661 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

कोरोनाबाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील*   सातारा 27, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1,  गुरुवार पेठ , शुक्रवार पेठ 1,  शनिवार पेठ 5, सदाशिव पेठ 1, शाहूनगर 2,  प्रतापसिंहनगर 1, करंजे पेठ 1, यादोगोपाळ पेठ  1, करंजे 1, पिल्लेश्वरीनगर करंजे 1, फॉरेस्ट कॉलनी गोडोली 1,  विलासपूर गोडोली 1,  व्यंकटपूरा पेठ 1, संभाजीनगर एमआयडीसी 1, केसरकर पेठ 1, भवानी पेठ 1, संगमनगर 1,  कृष्णानगर 1, अजिंक्यतारा 1, सदरबझार 1, अलंकार भवन 1,  स्टेट बँक पारंगे चौक 1, बालाजी साळुंखेनगर  1, गोळीबार मैदान 2, कामाठीपुरा 1, मेघदूत कॉलनी 1, न्यु क्रांती सोसायटी संभाजीनगर 1, अश्वीनी पार्क वनवासवाडी 1, संगम माहूली 1, जवान हौ. सोसायटी जरंडेश्वर नाका 1, विसावा नाका 1, सातारा सिव्हील  3, संभाजीनगर 1,  शळेकेवाडी 1, बागल चौक मालगाव 1, चिंचणेर 1,  किडगाव 1, नेले 1, आने 1,  शिवनगर 1, कोडोली 1,  चोरे 1, कळंबे 1, कण्हेर 4, वडूथ 10,  दरेखुर्द 7,  निसराळे 2, गोवे 1,  पोलीस लाईन 1, लुमनेखोल 1, खेड 1, लिंब 2, विलासपुर 1, कोंडवे 1, नागठाणे 2,

 

*कराड तालुक्यातील*  कराड 15, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 7, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5,  शनिवार पेठ  19, रविवार पेठ 1,   कृष्णा मेडीकल कॉलेज 2,  विद्यानगर सैदापूर 9,  कोयना वसाहत 1,  काझीवाडा परीसर 1, कार्वेनाका 7,   वखाणनगर ,  श्री हॉस्पीटल 6, गजानन हौसिंग सोसायटी 2,  शिवाजी हौसिंग सोसायटी 1, यशवंतनगर 1, विजयनगर 2, मार्केटयार्ड 1, गोळेश्वर रोड 1, बापूजी साळुंखे नगर 1, दादासाहेब चव्हाणनगर 2,  मलकापूर 16, आगाशिवनगर 2, खराडे , पाल 2, आरेवाडी 1, कुसूर 1, उंडाळे 1,  रेठरे बुद्रुक 8,  साकुर्डी 5, विंग 1, काले 2, वाघेवाडी 1,  ओंड 1, नडशी 1,  पाडळी केसे 2,  कोनेगाव 2, कापूसखेड 1,  शिरवडे 1, तांबवे 2, शेरे 3, आटके 3, वाण्याचीवाडी 1, उब्रंज 2, पोतले  1, कोपर्डे हवेली 1,  सुपने 2, वडगाव हवेली 1, वहागाव 1, बेलवडे बुद्रुक 3, मुंढे 2,  पार्ले 1, गोळेश्वर 3, जखीणवाडी 1, वसंतगड 1,  वनवासमाची-हजारमाची 1,

 

*पाटण तालुक्यातील* पाटण 4, मल्हारपेठ 1,  म्हावशी 1, नावडी 1, नाडे 1,  मारुल हवेली 1, बेलावडे खुर्द 3, मालदन 1, सणबुर 2

 

*महाबळेश्वर तालुक्यातील*   कुंभरोशी 1, अंबाघर तारकुडाळ 5, गोडवली 1,  खिंगर 1, संजिवन विद्यालय पाचगणी 2,

 

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील रविवार पेठ 2 , गणपती आळी  2, ब्राम्हणशाही 2, गंगापूरी 2,  अमृतवाडी 1, आसरे 1, यशवंतनगर 5, गणेशनगर 3, मुंगसेवाडी 1, बदेवाडी 2, शेंदुरजणे 7, दह्याट 1, सिध्दनाथवाडी 2, सुरुर 1, उडतारे 10, व्याजवाडी 1,  मलतपूर 6, मांढरदेव 1, शेलारवाडी 4,  भोगाव 7, मेढा 3,  कण्हूर 1, बोपेगाव 1, बावधन 5, कवठे  7,

 

*खंडाळा तालुक्यातील*   केसुर्डी 3, खेड 6, पाडळी 4, शिरवळ 8,  पिसाळवाडी 9,  नायगाव 1, निंबोडी 1, लोणंद 3, चव्हाणवस्ती पिंपरे बुद्रुक 4,  अंदोरी 1, माळआळी शिरवळ 1, चव्हाण आळी शिरवळ 1 , शिंदेवाडी 1

 

*जावळी तालुक्यातील*    जवळवाडी 2,  मेढा 13,  बिभवी 1, बामणोली 1, अंबेघर 1, बामणोली 1, भणंग 1,

 

*फलटण तालुक्यातील*  फलटण 3,  फलटण शहरातील  सोमवार पेठ 2,  रविवार पेठ 1, उब्रेश्वरचौक 1,   भडकमकरनगर  1 , शिंदेनगर 1, भास्कर गल्ली 1, परिट गल्ली 1, शिंपी गल्ली 1, विद्यानगर 1, वाखरी 2, काळज 1, चौधरवाडी  6, मलठण 4,  तामखाडा  12,  तरडगाव 4,  कोळकी 3, जिंती 1, पदमावतीनगर 3, सस्तेवाडी 1, धुळदेव 1, जाधववाडी 2, विडणी 3, सरडे 1, पिंप्रद 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, , आसू 1,

 

 

*कोरेगाव  तालुक्यातील* कोरेगाव 5, तारगाव 2, वाठार किरोली 1, मिलीट्री अपशिंगे 2, रामोशीवाडी 2, भिवडी 1, दहिगाव 1, पिपोंडे बुद्रुक 1, रहिमतपूर 7, वाठार स्टेशन 1, करंजखोप 1, शिवाजीनगर 1,

 

*खटाव तालुक्यातील*  खटाव 2,   पुसेसावळी 21, राजाचे कुर्ले 1, बुध 1,  चोराडे  11, उंचीठाणे 1, निमसोड 2, वडगाव 2, अंबवडे 6, खातगुण 13, वडूज 5,  विसापूर 10, येळीव 3, औंध 2, वरुड 1, डिस्कळ 1, कातरखटाव 1,

 

*माण तालुक्यातील*  म्हसवड 9, दहिवडी 3, पळशी 7,

 

*इतर जिल्हा*-  कडेगाव (सांगली) 1, केदारवाडी –वाळवा (सांगली) 1 , इस्लामपूर (सांगली) 1, डहाणू रोड (ठाणे),

 

*इतर* 1,

 

17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या  केसरकर पेठ सातारा येथील 63 वर्षीय महिला,  निसराळे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष,  पाली, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, चोराडे वडूज येथील  70 वर्षीय पुरुष, बसप्पाची वाडी सातारा येथील 65 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, वाघेरी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष,  शेडगेवाडी कराड येथील  67 वर्षीय पुरुष असे एकूण 8 नागरिक तसेच विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये  मांढरदेवी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष, म्हातेखुर्द ता. जावळी येथील 47 वर्षीय पुरुष,  सैदापूर कोंडवे ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष,  संगममाहुली सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 49 वर्षीय पुरुष असे एकूण 5 तसेच फलटण येथे तांबखडा येथील 54 वर्षीय पुरुष, बागेवाडी येथील  45 व 34 वर्षीय पुरुष असे एकूण 3 तर कोरोना केअर सेंटर मायणी येथे मायणी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष अशा सर्व एकूण  17 कोरोनाबाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  

घेतलेले एकूण नमुने                       --   45106

एकूण बाधित                                --  14658

घरी सोडण्यात आलेले                   --   7592

मृत्यू                                           -- 414

उपचारार्थ रुग्ण                             -- 6652

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...