$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
शाहुपुरी पोलीस स्टेशन , सातारा
गुटखा मालाच्या वाहतुकीवर शाहुपूरी डी.बी. पथकचा छापा . ( 1,59,875 चा मुद्देमाल जप्त )
सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्रो व वाहतूक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजय बोहाडे , मा.सहा . पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांना सूचना दिलेल्या होत्या . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंदयांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या . मा.पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अवैध गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री व वाहतुकी बाबत महिती प्राप्त करीत असताना दि .07 / 10 / 2021 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना / 2003 अमित माने यांना त्यांचे गोपनिय बातमोदारामार्फत बातमी मिळाली को , सातारा शहरातील गेंडामाळ ते अंजली कॉलनी जाणारे रोडने एक इसम त्याची ओमनी कार क्रमांक एमएच - 11 - एडब्ल्यू -9413 मधुन गुटखा सदृश्य मालाची वाहतूक करणार आहे , अशी माहीती मिळाली . सदर बातमीचे अनुशंगाने गुन्हे शाखेचे पथक अंजली कॉलनी येथील नगरपालीका गार्डनचे गेट समोरील रस्त्यावर दबा धरून थांबले . त्यानंतर रात्री 20.15 वा.चे सुमारास मिळाले . बातमीतील ओमनी कार क्रमांक एमएच - 11 - एडब्ल्यु -9413 हि आल्याने पथकातील पोलीसांनी कार थांबवून कार चालक व कारची पाहणी केली असता कारमध्ये सदरचा इसम गुटखा सदृश्य माल विक्री करणचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची वाहतुक करीत असताना मिळुन आला . सदर बाबत शाहुपुरी पोलीस ठाणे कडून अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांना कळविणेत आलेने अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाने नमुद मालाची तपासणी करुन 1,59,875 / - रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त करणेत आला आहे . सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री . इम्रान हवालदार यांनी संशयोत इसमाचे विरुध्द पोलीस ठाणेस दिले तक्रारी वरुन गुन्हा दाखल करणेत आला असून सदर इसमांस अटक करणेत आली आहे . अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत 1,59,875 / - रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा सापळा लावुन पकडुन संशयीत इसमास जेरबंद केले आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस उपनिरीक्षक श्री . शब्बीरखान मोकाशी हे करीत आहेत . सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बोन्हा मा.सहा . पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल , पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलोस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी . पोलीस नाईक लेलेश अशोक फडतरे , अमित माने , स्वप्निल कुंभार पो . का . ओंकार यादव , मोहन पवार व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राहन शहा , इम्रान हवालदार अनिल पवार यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment