Wednesday, October 20, 2021

दिनांक. २०/१०/२०२१. मार्गदर्शक सुचनेनुसार बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी...

           $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
मार्गदर्शक सुचनेनुसार बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

सातारा दि.20 (जिमाका):   कोविड-19 चे अनुषंगाने राज्य शासनाच्या   मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करणेत आलेले आहेत.  त्या मार्गदर्शक सुचनेस अधिन राहून अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयातील बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबर 2021 पासून परवानगी  दिली आहे.  

मार्गदर्शक सूचना :
परिशिष्ट-अ
                                                  भाग-१ बंदिस्त सभागृह
१. सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असेल.
२. बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असु नये.
३. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६  फुट) आवश्यक राहिल,
४. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहिल,
५. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.
६. आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुस-या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.
७. सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधन गृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखावे व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जतुकीकरण करण्यात यावे.
८. बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी पूर्णवेळ मास्क लावणे बंधनकारक राहील.
९. सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे.
 १०.कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करावीत.
 ११.कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री ( संगीत व्यवस्था / लॅपटॉप/ माईक / प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील, त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने त्याने स्वत:चीच साधनसामुग्री वापरावी.
१२.बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई कीट धारण करणे आवश्यक आहे.      
१३.बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.
१४.कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास मनाई राहील.
१५.परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रामध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा - स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे.
१६.श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने/ कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
१७.सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे.
१८.जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड - १९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाय-योजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.
१९.सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे.
२०.खाद्य व पेय पदार्थांच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे तेथे, अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर  राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्ट्या (स्टिकर) वापरून एक-रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल.
आयोजक व कार्यक्रमासाठी सहाय्य करणारे कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन तत्वे
1. बंदिस्त सभागृहात काम करणा-या सर्व कर्मचा-यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२.  वयाने ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे,असे कर्मचारी यांना ज्या ठिकाणी जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
३. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी आरोग्य सेतू" अॅपचा वापर करावा.
४. सर्व कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्या असणाऱ्या आजाराच्या तात्काळ व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणावे.
भाग-२
                 बंदिस्त सभागृहाव्यतिरीक्त मोकळ्या जागेत आयोजित होणारे कार्यक्रम.
१. मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी ६-६ फुटांवर खुणा करुन त्यानुसार लोक बसण्याची / उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील/ उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणा-या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी ०६ फुट अंतरावर असावेत.
२. कार्यक्रम/कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य राहील.
३. बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंध लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४   दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.
४. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान इ. बाळगण्यास मनाई राहील.
५. नशा आणणा-या पदार्थांचे / द्रव्यांचे सेवन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही.
६. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत व आयोजकांनी तपासणी करुनच प्रवेश दयावा.
७. गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी.
८. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास, कार्यक्रम पाहण्यासाठी उभे राहणे अथवा बसणे याकरिता मार्किंग करावे.
९. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणविषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरुन सूचना द्याव्यात.
१०.अनियंत्रित गर्दी व रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन परवानगी द्यावी.
११.कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील.
१२.कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, सजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील.
१३. माझे कुटुंब माझी जबाबदारी" ला अनुसरुन शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत.
१४.उपरोक्त बाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग ( आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनवर्सन ) / सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून Break the Chain अंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटकोर पालन करणे बंधनकारक आहे.
या आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेस संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व  साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात  येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

Friday, October 8, 2021

दिनांक. ०८/१०/२०२१. अवैध गुटखा मालाच्या वाहतुकीवर शाहुपूरी डी.बी. पथकचा छापा . ( 1,59,875 चा मुद्देमाल जप्त )

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
शाहुपुरी पोलीस स्टेशन , सातारा 
 गुटखा मालाच्या वाहतुकीवर शाहुपूरी डी.बी. पथकचा छापा . ( 1,59,875 चा मुद्देमाल जप्त )

सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्रो व वाहतूक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजय बोहाडे , मा.सहा . पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांना सूचना दिलेल्या होत्या . त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंदयांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या . मा.पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अवैध गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री व वाहतुकी बाबत महिती प्राप्त करीत असताना दि .07 / 10 / 2021 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना / 2003 अमित माने यांना त्यांचे गोपनिय बातमोदारामार्फत बातमी मिळाली को , सातारा शहरातील गेंडामाळ ते अंजली कॉलनी जाणारे रोडने एक इसम त्याची ओमनी कार क्रमांक एमएच - 11 - एडब्ल्यू -9413 मधुन गुटखा सदृश्य मालाची वाहतूक करणार आहे , अशी माहीती मिळाली . सदर बातमीचे अनुशंगाने गुन्हे शाखेचे पथक अंजली कॉलनी येथील नगरपालीका गार्डनचे गेट समोरील रस्त्यावर दबा धरून थांबले . त्यानंतर रात्री 20.15 वा.चे सुमारास मिळाले . बातमीतील ओमनी कार क्रमांक एमएच - 11 - एडब्ल्यु -9413 हि आल्याने पथकातील पोलीसांनी कार थांबवून कार चालक व कारची पाहणी केली असता कारमध्ये सदरचा इसम गुटखा सदृश्य माल विक्री करणचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची वाहतुक करीत असताना मिळुन आला . सदर बाबत शाहुपुरी पोलीस ठाणे कडून अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा यांना कळविणेत आलेने अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाने नमुद मालाची तपासणी करुन 1,59,875 / - रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा जप्त करणेत आला आहे . सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री . इम्रान हवालदार यांनी संशयोत इसमाचे विरुध्द पोलीस ठाणेस दिले तक्रारी वरुन गुन्हा दाखल करणेत आला असून सदर इसमांस अटक करणेत आली आहे . अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत 1,59,875 / - रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा सापळा लावुन पकडुन संशयीत इसमास जेरबंद केले आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस उपनिरीक्षक श्री . शब्बीरखान मोकाशी हे करीत आहेत . सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बोन्हा मा.सहा . पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल , पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलोस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी . पोलीस नाईक लेलेश अशोक फडतरे , अमित माने , स्वप्निल कुंभार पो . का . ओंकार यादव , मोहन पवार व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राहन शहा , इम्रान हवालदार अनिल पवार यांनी केली आहे .

Thursday, October 7, 2021

दिनांक. ०७/१०/२०२१. *186 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यू* *286 जणांना दिला आज डिस्चार्ज*

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*186 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; बाधितांचा मृत्यू*

*286 जणांना दिला आज डिस्चार्ज*

 

सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 6 (9989), कराड 40(39038), खंडाळा 4 (14128), खटाव 14 (25659), कोरेगांव 11 (21853), माण 28 (17799), महाबळेश्वर 1 (4678), पाटण 16 (10117), फलटण 16 (37113), सातारा 37(51504), वाई 5 (15703) व इतर 8 (2135) असे  आज अखेर एकूण 249716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच सातारा तालुक्यातील 3, वाई तालुक्यातील 1  अशा 4 जणांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरडिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 286 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2124351*

*एकूण बाधित – 249716*                          

*घरी सोडण्यात आलेले – 240691*

*मृत्यू –6333*

*उपचारार्थ रुग्ण– 5395*

Sunday, October 3, 2021

दिनांक. ०३/१०/२०२१. *175 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू* *52 जणांना दिला आज डिस्चार्ज*...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*175 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू*

*52 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 175 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 7 (9971), कराड 19 (38896), खंडाळा 14 (14107), खटाव 9 (25566), कोरेगांव 22 (21801), माण 27 (17739), महाबळेश्वर 1 (4675), पाटण 3 (10097), फलटण 27 (37005), सातारा 36 (51275), वाई 9 (15683) व इतर 1 (2106) असे  आज अखेर एकूण 248921 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरडिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 52 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2100091*

*एकूण बाधित – 248921*                       

*घरी सोडण्यात आलेले – 239763*

*मृत्यू –6091*

*उपचारार्थ रुग्ण– 5520*

Saturday, October 2, 2021

दिनांक. ०२/१०/२०२१. सुधारित *183 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; तीन बाधितांचा मृत्यू* *173 जणांना दिला आज डिस्चार्ज*

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*183 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; तीन बाधितांचा मृत्यू*

*173 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 183 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 2 (9964), कराड 5 (38877), खंडाळा 9 (14093), खटाव 30 (25557), कोरेगांव 8 (21779), माण 12 (17712), महाबळेश्वर 6 (4674), पाटण 5 (10094), फलटण 45 (36978), सातारा 51 (51239), वाई 7 (15674) व इतर 3 (2105) असे  आज अखेर एकूण 248746 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरडिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 173 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2093848*

*एकूण बाधित – 248746*      

*घरी सोडण्यात आलेले – 239711*

*मृत्यू –6089*

*उपचारार्थ रुग्ण– 5397*

Friday, October 1, 2021

दिनांक. ०१/१०/२०२१. *198 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू* *234 जणांना दिला आज डिस्चार्ज*

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*198 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू*

*234 जणांना दिला आज डिस्चार्ज*

सातारा दि.1 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 198 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदयांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

जावली 5 (9962), कराड 16 (38872), खंडाळा 15 (14084), खटाव 51 (25527), कोरेगांव 10 (21771), माण 20 (17700), महाबळेश्वर 0 (4668), पाटण 1 (10089), फलटण 35 (36933), सातारा 32 (51188), वाई 9 (15667) व इतर 4 (2102) असे  आज अखेर एकूण 248563 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरडिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 234 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉसुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 2086261*

*एकूण बाधित – 248563*       

*घरी सोडण्यात आलेले – 239538*

*मृत्यू –6086*

*उपचारार्थ रुग्ण– 5387*

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...