Wednesday, May 26, 2021

दिनांक. २६/०५/२०२१. 15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत निधीतूनग्रामपंचायत क्षेत्रात विलगिकरण कक्ष स्थापन करण्यास मान्यता / हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत:बंदसुधारीत आदेश जारी...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत निधीतून

ग्रामपंचायत क्षेत्रात विलगिकरण कक्ष स्थापन करण्यास मान्यता

सातारा दि. 25 (जिमाका) : कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीसाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामविकास विभागामार्फत एखाद्या ग्रामपंचायतीने कोविड झालेलया रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात 30 किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगिकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षास 15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (United) प्राप्त निधीच्या 25 टक्केच्या मर्यादेत खर्च करण्यास 25 मे रोजीच्या परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे.

            मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारणीबाबत योग्य ते नियोजन करुन  संबंधित ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगाच्या अबंधीत निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात येण्याबाबतही या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

                                                                        00000

हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद

सुधारीत आदेश जारी

  सातारा दि. 25 (जिमाका):  कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार  दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा लागू राहणार नाही.”

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...