$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
34 तोळे सोने आणि 55 किलो चांदी भुईंज पोलिसांनी केली जप्त
कोल्हापूरच्या ट्रॅव्हल्सवर आनेवाडी टोलनाका येथे कारवाई
भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांना खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आनेवाडी टोलनाक्यावर कोल्हापूरकडून आलेली ट्रॅव्हल्स एमएच09 सी 3299 ही रात्री 3 वाजता तपासणी केली असता चालक राजवीर तोमर याने उडवा उडवीची उत्तर दिली.अधिक तपासणी केली असता ट्रॅव्हलसमध्ये 13 लाख 72 हजार रुपयांचे 34 तोळे सोन्याचे दागिने, 14 लाख 31 हजार रुपयांचे 55 किलोची चांदी व दीड लाख आढळून आली.त्याच्या पावत्या ही त्याच्याकडे नसल्याने असा 29 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करून चालकास ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे -खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे, पीएसआय निवास मोरे, रत्नदीप भंडारे, पोलीस जवान विकास गंगावणे,बापूराव धायगुडे, अतुल आवळे, दुदुसकर, गायकवाड, कदम, वरणेकर यांनी सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment