Friday, November 20, 2020

दिनांक. 20/11/2020. *23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु* *शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे* *जिल्हाधिकारी शेखर सिंह*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
23 नोव्हेंबर पासून इयत्ता  9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु
शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे
                                                                जिल्हाधिकारी शेखर सिंह
 
 सातारा दि.20 (जिमाका): दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील इयत्ता  9 वी ते 12 वी चे वर्ग आणि इयत्ता 9 वी ते 12 चे वसतीगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 वी व 12 वी चे वसतिगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनां बाबतच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे
शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे. Thermometer, Thermal Scanner/Gun, Pulse Oxymeter, जंतूनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे. शाळा वाहतुक सुविधांचे निर्जंतुकीकरण सुनिश्चित करावे. एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णतः निर्जतुकीकरण करावे, क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.  शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दि. 17 ते 22 नोव्हेंबर, 2020 या दरम्यान कोविड-19 साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड-19 बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी.
सर्व भागधारकांचे त्यांच्या विशिष्ट जबाबदाऱ्यांसहित विविध कार्यगट गठित करावे जसे आपत्कालीन गट, स्वच्छता पर्यवेक्षण गट, इत्यादी. शिक्षक, विद्यार्थी व इतर भागधारक या गटांचे सभासद म्हणून सहकार्याने काम करतील. वर्गखोली तसेच स्टाफरुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.
शारीरिक अंतर च्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे. शाळेत दर्शनी भागावर Physical Distancing, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे posters/stickers प्रदर्शित करावे. थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर  राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन,वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे जसे पाणी पिण्याच्या सुविधा , हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी करण्यात यावा. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.
शाळेतील परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. पालकांची संमती विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहुन देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी.  विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-19 च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुक करणे. शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करून पुढील मुद्दयांबाबत कार्यवाही करावी. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छता विषयक सवयी. कोविड-19 बाबतच्या गैरसमजुती.कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड-19 च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार. घेत आहेत त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये, शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजा याबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावी. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे, विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून पुढील माहिती स्वयंघोषित करुन घ्यावी. आरोग्य सेतू अॅप वरील तपासणी अहवाल, तसेच अलीकडील आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य प्रवासाची माहिती. स्थानिक प्रशासनाकडून राज्य व जिल्हा हेल्पलाईन तसेच जवळील कोविड सेंटरबद्दलची माहितीचे एकत्रिकरण करावे.
 शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबतच्या मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे
शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परीस्थिती सतत राखणे. शाळेचा परीसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठभाग जसे लॅचेस, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टॅबलेट्स, खुर्ची इ.वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेतील व शाळेच्या परीसरातील सर्व कचरा नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावा. हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, शक्य झाल्यास अल्कोहोल मिश्रित हॅन्ड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे. शाळेतील स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात यावी, विद्यार्थ्यांनी सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे. शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमितपणे निर्जतुकीकरण करण्यात यावे. वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये. शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे  सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत तसेच, शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज साधी आरोग्य चाचणी जसे Thermal Screening घेण्यात यावी. विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तिला शाळेच्या आवारात व शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये. काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणावे. कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे.
शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहनात येतांना व वाहनातुन उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण करण्यात यावे. वाहनचालक व वाहक यांनी स्वत: तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील, याची दक्षता घ्यावी. किमान 6 फुट अंतर राखण्यात यावे. बस/कार यांच्या खिडक्यांना पडदे नसावेत. सामान्यत: खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात. वातानुकूलित बसेस मध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान राखावे. शक्य असल्यास वाहनात हँड सॅनिटायझर ठेवण्यात यावे. विद्यार्थ्यांनी शाळेने निश्चित केल्याप्रमाणे शाळेत उपस्थित रहावे. शाळेत वावरताना त्यांनी किमान 6 फुट अंतराचे पालन करावे. विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचे आगमन व गमन यांचे वेळापत्रक अशाप्रकारे निश्चित करावे, ज्यामुळे शाळेत होणारी गर्दी टाळली जाईल. विविध इयत्तांचे वर्ग सुरु होण्याच्या व संपण्याच्या वेळामध्ये किमान 10 मिनिटांचे अंतर असावे. शाळेच्या परिसरात चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, ही मुख्यध्यापकांची जबाबदारी असेल. शाळेस एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जातांना सर्व प्रवेशद्वरांचा वापर करावा. शाळेच्या बाहेरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी वाहतुक पोलिस किंवा समाजातील स्वयंसेवकाची मदत घ्यावी. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी. कुटुंबातील एखादा सदस्य किंवा घराजवळील एखादी व्यक्ती ताप / खोकला यांनी आजारी असल्यास आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याबाबत पालकांना अवगत करावे.  वर्ग खोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करावी.  शाळेत प्रात्यक्षिक कार्ये (Practicals) घेताना विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करुन घेण्यात यावेत म्हणजे शारीरिक अंतराचे (Physical Distancing) पालन करणे सुलभहोईल.विद्यार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल, इत्यादींची अदलाबदल करू नये.ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी. शक्य असल्यास वर्ग खुल्या परिसरात घ्यावेत, शक्य नसल्यास वर्गखोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये वर्ग भरवण्यात येऊ नये. उदवाहक व वरांड्यातील उपस्थित व्यक्तीच्या संख्येवर निबंध आणावेत. स्वच्छतागृहामध्ये अधिक गर्दी होऊ नये, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. वातानुकुलित वर्ग खोल्यांचे तापमान 24 ते 30 डिग्री सेंटिग्रेड ठेवावे. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे (50 टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित 50 टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी). अशाप्रकारे एकाच दिवशी 50 टक्के विद्यार्थी ऑनलाईन वर्गात व उर्वरित 50 टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील. इयत्ता निहाय ऑनलाईन व ऑफलाईन वर्गाचे वेळापत्रक, शिक्षकांची जबाबदारी निश्चिती याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, शक्यतो मुख्य विषय जसे गणित, विज्ञान व इंग्रजी शाळेत शिकवावेत व उर्वरित विषय शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शिकवावेत, प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक असू नये, प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाचीसुट्टी नसेल. शिक्षक, कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे. तात्काळ रुग्णालय किंवा जिल्हा व राज्य संपर्क क्रमांकास हेल्पलाईन कळवावे. त्यानंतर सर्व परिसराचे व त्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे. राज्य व जिल्हा हेल्पलाईन क्रमांक तसेच जवळील कोविड सेंटरची माहिती  त्यानंतर सर्व परिसराचे व त्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे. राज्य व जिल्हा हेल्पालाईन क्रमांक तसेच जवळील कोविड सेंटर बद्दलची माहिती मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकांच्या मोबाईलमध्ये असावी. मानसिक व सामाजिक कल्याण चिंता आणि निराशा यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या नोंदविणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नियमित समुपदेशन केले जाईल, याची सुनिश्चिती करावी. शिक्षकांनी, शालेय समुपदेशकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे व आपले मानसिक स्थिरतानिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे. वरील सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक सुचना निश्चित कराव्यात.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...