Thursday, November 5, 2020

दिनांक. 05.11.2020. *पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी*/*जलतरण तलाव,योगा संस्था, क्रीडा प्रकार, थिएटर, चित्रपट गृहे, मल्टीफ्लेक्स, ड्रामा थिएटर* *चालू करण्यास परवानगी प्र. जिल्हाधिकाऱ्यांचेआदेश जारी*/सातारा डाक विभागाद्वारे ‘माय स्टॅम्प’ सुविधा उपलब्ध

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी*

                सातारा दि. 5 (जिमाका): पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून सातारा जिल्ह्यात सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जारी केले आहेत.

                या आदेशानुसार . निवडणूकीचे कालावधीमध्ये सातारा जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणुका, मोर्चा काढणेस प्रतिबंध करणेत येत आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेणेस मनाई करणेत येत आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा, लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.  फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावरील ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.  निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 06.00 वाजे पुर्वी व रात्री 10.00 वाजेनंतर करता येणार  नाही. भारत निवडणूक आयोग यांचे आदेश क्र.437/6/96(पीएलएन-तीन)/2411, दि. 15 जानेवारी 1966 अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असेलेल्या शासकीय मोटारगाडया/वाहने यांच्या ताफ्यामध्ये पाच पेक्षा जास्त मोटारगाडया, वाहने वापरणेस निर्बंध राहील.. सार्वजनिक ठिकाणी संबंधीत पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, तसेच पुर्व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध राहील. शासकीय / निमशासकीय/सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निर्बंध घालणेत येत आहे.  कोविड 19 चे अनुषंगाने शासनाने, इकडील तसेच याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

00000

*जलतरण तलाव, योगा संस्था, क्रीडा प्रकार, थिएटर, चित्रपट गृहे, मल्टीफ्लेक्स, ड्रामा थिएटर*

 *चालू करण्यास परवानगी प्र. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

                सातारा दि. 5 (जिमाका):  पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जलतरण तलाव, योगा संस्था, क्रीडा प्रकार,  थिएटर, चित्रपट गृहे, मल्टीफ्लेक्स, ड्रामा थिएटर चालू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जारी केले.

                या आदेशानुसार दिनांक 30/11/2020 रोजीचे 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

I) सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करणेत येत आहेत.

1) सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट वगळून) या बंद राहतील. तथापी  ऑनलाईन/दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील. ऑनलाईन शिक्षण /दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील, त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील.  केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाल्या नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील,  इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विद्यापीठे, खासगी विद्यापीठे, इ. ते केवळ संशोधन अभ्यास (पी.एच.डी. आणि विज्ञान आणि तंत्राज्ञानातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील / प्रायोगिक कामांसाठी परवानगी राहील.

 

सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक  अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविका आदेशाने गान्यता दिली असेल किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील,  सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठया संखेने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु  इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत या आहे. सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील.  तथापि, रोथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.  

सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील

                 हॉटेल / फुड कोर्टस्, रेस्टॉरंट आणि बारस् यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देत आहे. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  ऑक्सिजनची वाहतूक करणान्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे.   राज्य व केंद्र शासनाने कोव्हिड- 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्टाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवासास मुभा राहील.  सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 9.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत.  सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृहे, घर, घराच्या परिसरात 50 लोकांच्या कार्यक्रमासाठी मर्यादीत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभ  आयोजन करण्यास संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकार राहील.  अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह). बाग, उदयाने आणि करमणुकीच्या उददेशाने सार्वजनिक मोकळया जागा चालु राहतील. कन्टेनमेंट झोन बाहेर, व्यवसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थनिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडणेस परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.) रेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करणेची आवश्यक्ता नाही. तथापी कोविड- 19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजीक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे.  केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.न.आ/कावि/15722020 दि. 27/06/2020 मधीलअटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे. सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.ने.आ/कावि/1477/2020 दि. 11/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चाल ठेवणेस परवानगी राहील इंनडोअर हॉल मधील खेळाच्या सुविधा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2740/2020 दि. 19/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील व्यायामशाळा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्तीध्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 23/10/2020 आदेशामधील अटी व शर्तीन्यये चालू ठेवणेस परवानगी राहील.  सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस  राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडापटुंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रिडा व युवा व्यवहार विभागाकडून निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणारनी (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात योग संस्था चालु करणेस परवानगी राहील. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शुटिंग रेंज इ. मधील सर्व खेळांमध्ये शासरीक व स्वच्छताविषयक पालन करुन चालु करणेस परवानगी राहील.  कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/ मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे बसण्याच्या 50% क्षमतेने चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

 सातारा जिल्हयातील पर्यटन स्थळे खुली करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.ने.आ/कावि/2923/2020 दि. 04/11/2020 मधील अटी व शर्तीन्धये चालू ठेवणेस परवानगी राहील. अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस परवानगी राहील.

 कोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक/फौजदारी कारवाईस पात्र राहील.

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तीवर 500/- रु दंड आकारावा,  सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त  प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी धुंकणेस मनाई असून, थुकल्यास 1000/- रु दंड आकारावा.   दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी र.रु.2000/- व शहरी भागासाठी र. रु.3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यंत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.  जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

 शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.  कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. THERMAL  ACNNING, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची ENTRY POINT व EXIT POINT वर व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टी वेळी, कामावर येतानाध कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

आरोग्य सेतु अँप चा वापर - जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे अॅप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी  अद्ययावत करणे बंधनकारक राहील,मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 30/09/2020 मधील Annexure 1 मध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे बंधितांवर बंधनकारक राहील,  ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहिर करणेचे अधिकार INCIDENT COMMANDER म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या Z.one मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश CONTAINMENT ZONE वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच CONTAINMENT ZONE बाबत त्या त्या क्षेत्रातील INCIDENT COMMANDER यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच CONTAINMENT ZONE INACTIVE झालेनंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागु राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 30/09/2020 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 138 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

00000
सातारा डाक विभागाद्वारे माय स्टॅम्प सुविधा उपलब्ध

 

सातारा दि. 5 (जिमाका):   टपाल तिकीट प्रेमींना एक नामी संधी डाक विभागाने ‘माय स्टॅम्प’ च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या स्व:ताला टपाल तिकिटावर पाहता येणार आहे.  हा एक वयक्तिक पोस्टल स्टॅम्प असणार आहे  जो की  टपाल तिकीट प्रेमींना संग्रहणीय आणि आवडत्या व्यक्तींना भेट वस्तू पाठविताना उपयोगी येणार आहे. वैयक्तीक टपाल तिकीट बनवताना टपालाच्या निवडलेल्या टेम्पलेट शीटवर स्व:ताचे  छायाचित्र आणि  संस्थांचे लोगो किंवा कलाकृतीवारसा इमारतीप्रसिद्ध पर्यटन स्थळेऐतिहासिक शहरेवन्यजीवइतर प्राणी व पक्षी इत्यादींची प्रतिमा छपाई करून वैयक्तिकृत केले जाणार आहे.

                भारतात सर्वप्रथम माय स्टॅम्प’ जागतिक फिलाटेलिक प्रदर्शनात - ‘इंडिपेक्स-२०११’ मध्ये सादर करण्यात आला. ही योजना निवडक फिलाटेलिक ब्युरोक्स आणि काउंटर / पर्यटन स्थळांवर स्थित महत्वाची टपाल कार्यालये / पोस्ट कार्यालये उपलब्ध आहे.

                सातारा डाक विभागाच्या वतीने हि सेवा सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ मॅप्रो गार्डनगुरेघर-पांचगणी, सातारा या ठिकाणी श्री. मयूर वोरा, MD, मॅप्रो गार्डन व श्री. ऋषिकेश चव्हाण(मापारी), GM, मॅप्रो गार्डन  व व्यवस्थापन यांच्या सहयोगाने दि. ०५.११.२०२० पासून सुरु करण्यात आली आहे. सर्व पर्यटक यांनी स्वताचा व कुटुंबियांचा माय स्टॅम्प बनवून आपली सहल संस्मरणीय बनवावी असे आवाहन श्रीमती अपराजिता म्रिधा (IPoS), प्रवर अधिक्षक डाकघर सातारा विभाग सातारा यांनी केले आहे.  

                यासाठी ग्राहकांना स्व:ताचा एखादा खास अथवा प्रत्यक्ष फोटो काढलेला फोटो, एक फॉर्म, आयडी प्रुफ आणि रु.३०० इ. ची पूर्तता करावी लागेल. यामधून ग्राहकांना १२ ‘माय स्टॅम्प च्या प्रती मिळतील. तसेच कॉर्पोरेट माय स्टॅम्प ची सुविधा उपलब्ध आहे. ज्या कंपनी आणि फर्म यांना आपले वार्षिक वर्धापन दिन, स्मृतिदिन, कंपनी  लोगोच्या माय स्टॅम्प प्रती मागणी प्रमाणे करून मिळतील, अशी माहिती श्रीमती अपराजिता म्रिधा (IPoS), प्रवर अधिक्षक डाकघर, सातारा विभाग सातारा यांनी दिली आहे. अधिक माहिती साठी सातारा डाक विभागीय कार्यालय ०२१६२-२३७४४३ / २३७४३७ या दूरध्वनी क्रमाकावर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...