https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
ब्रेकिंग:- सोलापूर सातारा आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् नियुक्त्या...
राज्य गृह विभागाने सोलापूर सातारा रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पदी आयपीएस अधिकार्यांच्या नियुक्त केल्या आहेत काही दिवसांपूर्वी राज्यातील पोलिस अधीक्षक आणि उपायुक्तांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या काही ठिकाणच्या बदल्या होणे अद्यापही बाकी आहेत त्यापैकी राज्य गृह विभागाने आज काही ठिकाणच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव आणि त्यापुढे कुठून कुठे बदली झाली याबाबत पुढील प्रमाणे...
1) अशोक दुधे( प्रतीक्षाधीन ते पोलीस अधीक्षक' रायगड)
2) अजय कुमार बन्सल (प्रतिक्षाधीन ते पोलीस अधीक्षक सातारा)
3) श्रीमती तेजस्वी सातपुते (पोलीस अधीक्षक ते पोलीस अधीक्षक सोलापुर)
4) कुमार चिंथा (सहाय्यक पोलीस अधीक्षक / उपविभागीय अधिकारी अमळनेर उपविभाग, जळगाव ते सहाय्यक पोलीस अधीक्षक /उपविभागीय अधिकारी, जळगाव उपविभागीय, जळगाव.)
रायगड चे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जळगाव उपविभागातील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment