सातारा येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रवेश अर्जाची विक्री सुरु
सातारा दि. 7 (जि. मा. का) : शासकीय तांत्रिक विद्यालय तथा औद्योगिक शाळा, सातारा येथे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, कनस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी व ऑमोबाईल टेक्नॉलॉजी या प्रत्येकी 30 मंजुर प्रवेश क्षमता असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जाची विक्री सुरु करण्यात आली आहे. तरी प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी मुळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (असल्यास) घेवून शासकीय तांत्रिक विद्यालय तथा औद्योगिक शाळा, शाहू स्टेडियम समोर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 9922443626, 9921957978 या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधावा.
0000
पुसेगाव येथील शासकीय विद्यानिकेत शाळेचा 10 वीचा निकाल 100 टक्के
सातारा दि. 7 (जि. मा. का) : माध्यमिक शालांत परीक्ष मार्च 2020 या शैक्षणिक वर्षात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगाव शाळेतील 28 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झालेले होते. गतीवर्षीप्रमाणेही या शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे. या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य बी.एम. वसेकर यांनी अभिनंदन करुन भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0000
नाबार्डकडून नागरिकांसाठी सूचना
सातारा दि. 7 (जि. मा. का) : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही आणि सातारा जिल्ह्यास राज्यातील 36 जिल्ह्यात केवळ एक अधिकारी जिल्हा विकास प्रबंधकाच्या (डीडीएम) माध्यमातून कार्य करते. कुठल्याही योजनेंतर्गत नाबार्डचा प्रत्यक्ष लाभार्थी बरोबर संबंध येत नाही आणि नाबार्ड कुठलेही शुल्क अथवा कमीशन आकारत नाही. जिल्हा विकास प्रबंधकाव्यतिरिक्त जिल्ह्यात नाबार्डचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी पदस्थापित नाही, असे नाबार्डचे डीडीएम सुबोध अभ्यंकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment