Tuesday, August 4, 2020

दिनांक 4/08/2020. मनोधैर्य योजनेची 133 प्रकरणे मंजूर- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तृप्ती जाधव...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

मनोधैर्य योजनेची 133 प्रकरणे मंजूर

- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तृप्ती जाधव

सातारा दि. 4 (जि. मा. का) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्षति सहायक व पुनर्वसन मंडळाच्या बैठका घेवून मनोधैर्य योजनेंतर्गत मदत मिळण्याकरीत पोलीस विभागाकडून दाखल झालेल्या  प्रकरणांची नियमाप्रमाणे पडताळणी करुन 14 मे 2018 ते 18 जुलै 2020 या कालावधीतील 133 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी दिली आहे.

या मंजूर प्रकरणांमध्ये अंदाजे 50,00,000/- रुपये  इतके सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. त्यापैकी आजअखेर प्रत्यक्षात पिडीतांना 28, 80,000/- रुपये अदा करण्यात आले आहेत. उर्वरीत पिडीतांना पोलीस विभागामार्फत प्रकरण मंजूर झाल्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

मनोधैर्य योजनेंतर्गत दाखल असलेल्या प्रकरणामधील पिडीत महिलांनी सक्षम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा या कार्यालयात येवून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...