Thursday, August 6, 2020

दिनांक 06/08/2020. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि. 6 (जि. मा. का) : शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदीव, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य (60 टक्के पेक्षा जास्त) गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणानुक्रमे उपलब्ध निधीच्या प्रमाणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां.भ. गिऱ्हे यांनी दिली आहे.

                विशेष प्राविण्य मिळावलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 22 अ जुनी एमआयडीसी रोड बॉम्बेरेस्टॉरंट चौक, सातारा येथे अर्ज करावा. अर्जासोबत  छायाचित्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशबाबातचा पुरावा जोडावा असेही श्री. गिऱ्हे यांनी कळविले आहे.

0000

माजी सैनिकांनी पाल्यांच्या शैक्षणिक आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

                सातारा दि. 6 (जि. मा. का) : माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत शैक्षणिक आर्थिक मदत दिली जाते. या मदतीसाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. शैक्षणिक आर्थिक मदतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...