रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभागातून एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा : भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी
महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना सोयीसुविधा मिळून ते सक्षम होण्यासाठी, क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे आणि पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाप्रमाणे प्रत्येक विभागात क्रीडा मतदार संघ तयार करून त्यातून प्रत्येकी एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा अशी मागणी भा ज पा सातारा शहराध्यक्ष आणि गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार (सातारा जिल्हा ) विजेते , विकास गोसावी यांनी जिल्हाध्यक्ष आमदार श्री जयकुमार गोरे आणि आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली
महाराष्ट्र राज्यातील क्रीडाक्षेत्र आणि खेळाडू यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू यांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि खेळाडू सक्षम करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाप्रमाणे क्रीडा मतदारसंघ तयार करून प्रत्येक विभागातून एक क्रीडा आमदार निवडावा अशी मागणी करत या साठीचे निवेदन आणि लेखी प्रस्ताव विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना सादर केला
क्रीडा क्षेत्रात अनेक समस्या आहेत, स्टेडियम, क्रीडांगणे, खेळाडू, शाळा कॉलेज यांचा क्रीडा विभाग यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो,
अनेक ग्रामीण खेळ हे परदेशात जातात आणि त्या ठिकाणाहून नवीन नावाने त्या देशाचे नाव घेऊन हे खेळ भारतात येतात आणि नंतर त्यांना मान्यता मिळते.
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना जी नवीन खेळांना मान्यता देते ती एक सोसायटी अंतर्गत रजिस्ट्रेशन झालेली संघटना आहे , त्यांच्यावर शासनाचे नियंत्रण काहीच नाही , त्या मुळे नवीन खेळांना लवकर मान्यता दिली जात नाही,क्रीडा परिषद आणि क्रीडा, युवक संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विषय असून ज्या संघटनांना महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना मान्यता देते त्यांच्या स्पर्धा भरवण्याचे काम हे विभाग करतात , या मध्ये सर्व शासकीय अधिकारी असल्याने ते त्यांच्या नियमाप्रमाणे काम करतात
या सर्व बाबींमुळे ग्रामीण खेळांकडे, ज्यांचा उगम महाराष्ट्रात, भारतात झाला आहे अशा खेळांकडे दुर्लक्ष होत आहे,अनेक क्रीडांगणे, स्टेडियम चे स्थानिक धनदांडग्यांच्या फायद्यासाठी व्यापारीकरण करण्यात आले आहे
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून त्या मार्फत क्रीडा विश्वाच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांचा अभ्यास करून त्यांचे कायमस्वरूपी निराकरण करावे
त्याच प्रमाणे ज्या नोंदणीकृत संघटना आहेत त्यांच्या सदस्यांची, नोंदणी केलेल्या अठरा वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंची मतदार यादी बनवून प्रत्येक विभागातून क्रीडा क्षेत्रातील एक आमदार निवडून क्रीडा क्षेत्राचा विकास करावा
क्रीडा क्षेत्र हे खूप मोठे आहे , प्रत्येक घरातील एक तरी मुलगा, मुलगी, किंवा मोठी व्यक्ती या क्षेत्राशी निगडित आहे , या महाराष्ट्र राज्य क्रीडाक्षेत्र विकास महामंडळाची स्थापना करून, प्रत्येक विभागातून एक आमदार निवडून , आपण या क्षेत्रातील समस्या हाताळण्यास सुरुवात केली तर त्या मुळे क्रीडा संघटना, ग्रामीण खेळ आणि खेळाडू यांना न्याय मिळेल आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले ध्येय
" खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया" अभियान यशस्वी होण्यासाठी मदत होईल, असे निवेदनात नमूद केले आहे
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून क्रीडा क्षेत्रातील सर्व संघटनाचे प्रतिनिधी त्यात घेतले तर, ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन मिळेल
क्रीडा क्षेत्राचा विकास म्हणजे तरुणांना त्यांच्या क्रीडा क्षमता/सहभागासह प्रगती करण्यासाठी दुवे आणि संधी प्रदान करणे . आपल्याकडे अत्यंत कमी सुविधा, मैदानांची वानवा, खेळाडुंना पुरवल्या जाणाऱ्या सोयी उपलब्ध आहेत , खेळाडूंना दजेदार साधने मिळाली पाहिजेत ,या क्रीडा क्षेत्र विकास महामंडळाचा फायदा यासाठी होईल. ज्या खेळांच्या संघटना आहेत त्यांनाही स्वतःचे मैदानच नाही अशी अवस्था आहे त्यातुन त्या खेळाला किती लाभ होणार आणि त्यातून महाराष्ट्राला किती खेळाडू मिळणार, यासाठी क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून त्या मार्फत येत्या काळात भरीव योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला , तर आणि तरच क्रीडा क्षेत्रातही ‘अच्छे दिन’ येतील.
नवी धोरणे, नवे उपक्रम, गणवत्तावाढ करण्याची तीव्र इच्छा, परिवर्तनच्या दिशेने उचललेली पावले, गतिमानता व लोकसहभाग हे साध्य करण्यासाठी प्रभावी योजनांच्या कार्यवाहीचे प्रयत्नही या महामंडळा मार्फत करण्यात यावेत ,या महामंडळात कर्मचारी नेमताना ते राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंमधूनच नेमले जावेत
प्रत्येक तालुक्यातील सर्व खेळाडु मग ते कोणत्याही खेळाशी संबंधित असुदे त्या खेळला महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची मान्यता नसली तरीही त्या खेळाडूंची, प्रशिक्षकांची आणि पंचपरीक्षकांची नोंदणी ही महामंडळाकडे करण्यात यावी, या साठी एक अँप विकसित करावे ज्या मध्ये खेळाडू, खेळ, प्रशिक्षक, संघटना याची पूर्ण माहिती घेऊन हि माहिती सदर संघटनेकडून तपासून घ्यावी , प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच परीक्षकांना एक कायम स्वरूपी आयकार्ड आणि नोंदणी क्रमांक द्यावा,एखाद्या शासकीय किंवा संघटनेच्या स्पर्धेत खेळताना, खेळाडूंना, प्रशिक्षकांना किंवा पंच परीक्षकांना इजा झाल्यास त्यांच्या औषधोपचाराचा खर्च महामंडळाने करावा, त्या ठीकाणी एखादा अवयव बसवावा लागला, ऑपरेशन करावे लागले तरी त्या बाबत महामंडळाने मदत करावी,महामंडळाकडे नोंदणी झालेल्या सर्व खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा आणि पंच परीक्षकांचा अपघाती विमा महामंडळाने काढावा . प्रत्येक जिल्ह्यात ज्या शाळा कॉलेज चे खेळाडू जास्त प्रमाणात आणि जास्त खेळात सहभागी होतील त्या मधील पहिल्या पाच शाळांचा सन्मान सुद्धा महामंडळा मार्फत प्रत्येक वर्षी केला जावा
विविध खेळांच्या असोसिएशन मार्फत प्रत्येक वर्षी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात, याचसाठी काही असोसिएशन कडून स्पर्धेसाठी खेळाडूंच्याकडून शुल्क आकारले जाते, पण काही खेळाडूंकडे यासाठी पैसे नसल्याने त्यांच्याकडे क्षमता असताना सद्धा ते खेळु शकत नाहीत म्हणून या घेतल्या जाणाऱ्या तालूकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धाचे नियोजन या महामंडळाच्या जिल्हास्तरीय समितीमार्फत व्हावे खेळाडूंच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये.
महामंडळाने या साठी संघटनांना मदत करावी आणि ती रोख स्वरूपात न देता त्या स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, खेळाडूंना जेवण, नाश्ता, पंचपरीक्षक मानधन, या स्वरूपात द्यावे. खेळाडू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन च्या गाडीने किंवा रेल्वेने आले तर त्यांचा प्रवास खर्चही यातूनच केला जावा ,जेणेकरून प्रवास खर्चासाठी पैसे नसल्याने गुणी खेळाडू मागे राहणार नाही जे खेळाडू खाजगी वाहनाने स्पर्धेसाठी जात असतील किंवा परत येत असतील तर त्यांच्या गाडयांना सर्व ठिकाणी टोल माफ करावा.
ग्रामीण आणि पूर्वापार खेळल्या जाणाऱ्या खेळांना महामंडळाने सहकार्य करून शासकीय मान्यता मिळवून द्यावी
प्रत्येक खेळाडूला शासकीय नोकरी देणे शक्य नाही, या साठी स्टार्टअप इंडिया मधून क्रीडासाहित्य तयार करणे, विकसित करणे यासाठी खेळाडूनच प्रोत्साहन देऊन व्यवसायाकडे वळवणे आणि आर्थिक मदतीसाठी, कर्जपुरवठा होण्यासाठी बँकांना हमीपत्र देणे. तसेच साई प्रशिक्षण केंद्र , राज्यातले क्रीडा कार्यालये बालेवाडी , छ संभाजीनगर आणि इतर विभागीय क्रीडा संकुले, स्पर्धा यांना लागणारे क्रीडा साहित्य खेळाडूंच्या आस्थापना कडून खरेदी करून महामंडळा मार्फत दिले जावे आणि खेळाडूंना आर्थिक सक्षम बनवावे
असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे
या प्रस्तावाची प्रत माहिती साठी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखरजी बावनकुळे आणि
क्रीडा व युवक कल्याण,मंत्री
महाराष्ट्र राज्य ना श्री गिरीशजी महाजन यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत
या वेळी भा ज पा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर , जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष कृणाल मोरे उपस्थित होते.